नमस्कार मित्रांनो,

आज आपण जाणून घेणार आहोत की आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी काय करावे. शिव पुराणात काही आशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या वस्तूंचे दान केल्यास आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकते. तसेच शिव पुराणात आशा 6 वस्तू सांगितल्या आहेत ज्या वस्तूंचे दान आपण केले तर महादेवांच्या कृपा आशिर्वादाने आपल्याला सुख-समृद्धी लाभते.

शास्त्रात असे म्हंटले आहे की दान केल्याने आपल्याला त्याची परतफेड 100 पटीने परत मिळते. म्हणून दान करताना कधीही आपला हात आकडता घेऊ नये. चला तर जाणून घेऊया त्या कोण-कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आवश्य दान केल्या पाहिजेत. यात पहिली वस्तू आहे मीठ, मीठ हे सर्वात स्वस्त व सगळीकडे उपलब्ध असते. म्हणून मिठाचे दान हे अगदी सहज करण्यासारखे दान आहे.

मिठाचे दान केल्याने प्रत्येक्ष किंवा अप्रत्येक्ष त्रास असतील त्या त्रासापासून आपली सुटका होते. सोमवारी मिठाचे दान करणे खूपच शुभ असते. यामुळे आपले दारिद्र्य, दुर्भाग्य, संकटे, वाईट शक्तींचा वावर हे सर्व काही दूर पळते. जर जाड मिठाचे दान केलात तर खूपच चांगले. परंतु मिठाचे दान करताना विशेष लक्ष द्यावे की मीठ सरळ आपल्या हातातून दुसऱ्याच्या हातात ठेवू नये.

दुसरी वस्तू म्हणजे गुळ, गुळाचे दान केल्याने आपले नातेसं-बंध सुधारतात. जर आपले कुणाशी पटत नसेल किंवा पती-पत्नी मध्ये सं-बंध बिघडले असतील. तर सोमवारी महादेवांच्या मंदिरात गुळाचे दान करावे. तसेच पोळीमध्ये गुळ टाकून ती पोळी गाईला खायला दिल्यास आपले नातेसं-बंध मधुर होतात.

पुढील वस्तू म्हणजे काळे तीळ, काळ्या तिळाचे याचे दान केल्याने आपल्या आत्मविश्वासात वाढ होते. आपण सोमवारी किंवा शनिवारी काळ्या तिळाचे दान करू शकतो.
पुढील वस्तू साजूक तूप, साजूक तुपाचे दान केल्याने आपले आरोग्य सुधारते. मुले जर वारंवार आजारी पडत असतील तर मुलांच्या हाताने साजूक तूपाचे दान करावे म्हणजे त्यांच्या प्राकृतित सुधारणा होईल.

गाईचे तूप असेल तर खूपच चांगले. महादेवांना साजूक तुपाने अभिषेक केल्यास आजारांपासून आणि संकटांपासून आपले रक्षण होते व धन संपदा मिळते. पाचवी वस्तू म्हणजे धान्य कोणत्याही प्रकारची वेगवेगळी धान्य जर आपण दान केलीत तर देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपल्या घरात भरभराट येते. तसेच आपल्याला कोणत्याही अन्न धान्याची कमतरता कधीच भासत नाही.

सहावी वस्तू म्हणजे कपडे कोणत्याही गरजू व्यक्तींना कपडे दान केल्यास आपण दीर्घायुषी होतो. गरजू व्यक्तींना कपडे, ब्लॅंकेट आपल्याला जे काही शक्य होईल ते दान जरूर करावे. परंतु जुने कपडे कधीही दान म्हणून देऊ नयेत. नविन कपडे आणून त्या कपड्याचे दान केल्यास आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. आपल्या जीवनात चांगल्या घटना घडू लागतात.

आता आपल्या लक्षात आले असेल की महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी कोण कोणत्या वस्तूंचे दान करावे..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *