नमस्कार मित्रांनो,

हिंदू पंचांगानुसार नवीन वर्ष व नवीन दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच चैतन्याचा गुढीपाडवा होय. हा गुडीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार मराठी वर्षाचा पहिला दिवस व पहिला सण. या दिवशी विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारली जाते. आपल्या हिंदू परंपरेनुसार गुढीपाडवा हा सण प्रत्येक घरी उत्साहात, आनंदात साजरा केला जातो.

सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा भारतीय पंचांग सुरु होते. गुढी उभारून येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. नवीन संकल्प, नवीन आशा, नवीन विचार घेऊन आपण नवीन संकल्प करतो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळेच या दिवशी अनेक संकल्प केलेले पूर्णत्वास जातात.

तसेच या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते व ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत सुरू राहते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो त्यामुळे त्याच्या पूजनाचा ठराविक असा कालावधी नसतो. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करावे, सकाळी प्रसन्न मनाने देवपूजा करावी व सतत ईश्वराचे चिंतन करावे त्यामुळे मन प्रसन्न राहते. अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढावी.

तसेच झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण मुख्य द्वारावर लावावे. गुढी तयार करण्यासाठी एक वेळूची काठी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. त्यानंतर तिला रेशमी भगवे वस्त्र किंवा सुंदर साडी एक टोकाला बांधावे. त्यावरती एखादा तांब्याचा कलश स्वच्छ धुवून घालावा, त्यावरती एकीकडे कुंकूने स्वस्तिक व दुसरीकडे ओम चिन्ह काढावे.

या काठीला आंब्याची डहाळी, फुलांची माळ, साखरेची माळ घाला अथवा बत्ताशांची माळ घालावी. तसेच कडुलिंबाची डहाळी घालावी. त्यातील थोडा कडुलिंब बाजूला ठेऊन त्याची गुळासोबत पेस्ट करावी. तयार केलेली, सजवलेली गुढी आपल्याला योग्य दिशेने लावायची आहे, घरात उभं राहिल्यावर आपल्या उजव्या बाजूला दिसेल अशा पध्दतीने गुढी उभी करतो.

बरेच लोक जागे अभावी खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारतात. परंतु तसे न करता गुढी ही आपण घरातून बाहेर पाहिल्यावर आपल्या उजव्या बाजूला दिसेल अशी उभी करा. गुढी उभी केल्यानंतर तिचे यथोचित पूजन करा, पूजन करताना एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तो म्हणजे

ओम ब्रम्हध्वजाय नमः  या मंत्राचा पूजा करताना, प्रार्थना करताना जप करा. मनापासून नमस्कार करून गुढीला तुमच्या येत्या वर्षातील संकल्प पूर्तीसाठी प्रार्थना करा. त्यानंतर गुळ आणि कडुलिंबाची पेस्ट नैवेद्य दाखवून सर्वांना द्यावी कारण ती खूप आरोग्यदायी असते.

ही गुढी आनंदाचे, मांगल्याचे प्रतिक आहे. ती उभी करताना सावकाश काळजीने उभी करा व धक्का लागू देऊ नका. तसेच ही गुढी उतरताना सुद्धा काळजी घ्या, ती तुम्ही सूर्यास्तापूर्वी उतरायची आहे. सूर्यास्तानंतर गुढी उभी ठेवायची नसते असे आपले शास्त्र सांगते.

आपल्या शास्त्रानुसार गुढीपाडवा हा सूर्यास्तानंतर साजरा केला जात नाही. तसेच रात्री ती तशीच उभी ठेवणे किंवा रात्री उतरणे अयोग्य मानले जाते व आपल्या जीवनासाठी ते घा त क असते. गुढी ही ब्रम्हांडातील सत्व लहरी, शुभ लहरी आकर्षित करून आपल्या घरात प्रवेश करतात.

या दिवशी सृष्टीत प्रजापती लहरी जास्त सोडल्या जातात त्या आकर्षित करण्याचं, खेचण्याचं काम गुढीवरील तांब्याचा कलश करत असतो. तसेच जो कडुलिंब असतो तो घरात नकारात्मक गोष्टी प्रवेश करू देत नाही व त्याची पेस्ट आपल्याला श रीर रो-गप्रतिकारक बनवण्यासाठी मदत करते ज्यामुळे कफ, वात आणि पित्त नियंत्रित राहते.

अशा प्रकारे गुढीचे खूप महत्व आहे. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे प्राईम मराठी फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *