नमस्कार मित्रांनो आज या लेखात तुम्हाला खूप महत्वाची माहिती दिली आहे. काही व्यक्तीचे वजन जास्त असते ,तर काही व्यक्तीचे वजन कमी असते. खूप कमी लोकांचे वजन स्थिर असते. शरीरावरील जास्त असलेली चरबी कमी करण्यासाठी आपण विविध उपाय नेहमी करत असतो. त्याचे परिणाम लवकर मिळतात , तर काही थोड्या उशिराने मिळतात.

आपण आज वजन कमी करण्यासाठी प्रभावी असे घरगुती उपाय पाहणार आहोत. आपण वजन जास्त झाल्यास खूप मनावर
ताण घेतो. महिला वर्ग तर खूप ता’ण घेतात. वजन वाढल्यामुळे जलद गतीने हालचाल करता येत नाही . चरबी वाढल्यामुळे घाम येते .
आपल्या आवडी चे कपडे घालता येत नाही. कपडे घातले तरी उत्तम दिसत नाही.

त्यामुळे थोडे सैल कपडे परिधान करतो. वजन वाढल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वजन वाढीचा आरोग्यावर देखील
परिणाम होतो. वजन जास्त झाल्यामुळे दमा लागू शकतो. आपले सारे शरीराचे भार पायावर पडल्यामुळे पायातील सांधे दुखतात. हा उपाय केल्याने शरीरातील चरबी कमी होवून वजन देखील कमी होईल.

हा उपाय खूप घरगुती आहे. हा उपाय करण्यासाठी फक्त दोनच वस्तू लागतात. किचन मध्ये वापरली जाणारी वस्तू म्हणजे लिंबू. हा उपाय करण्यासाठी लिंबू लागणार आहे. लिंबू हे फार गुणकारी आहे. वजन कमी करण्यासाठी जे पेय असतात त्यामध्ये लिंबूचा उपयोग करतात.

लिंबूच्या रसापेक्षा , लिंबुच्या साली मध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लींबुच्या सालीचा खूप
फायदा होतो. एक लिंबू घेवून त्याच्या गोल चकत्या कापून घ्यायचे. लिंबू वजन कमी करते. यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप मदत होते. आपण जे आहार पदार्थ सेवन करू त्याचे उत्तम पचन होते.

त्यामुळे चरबी वाढणार नाही. लिंबू रस शरीरातील रक्त शुद्ध करते. शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकते. लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते, त्यामुळे शरीरातील चरबी विरघळण्यासाठी मदत होते. वजन कमी करण्यासाठी वापरले जाणारे पेय नेहमी गरम करून पिले पाहिजे. पाणी घेवून त्याला चांगले गरम करून घ्या. त्याला एक उकळी येवू द्या.

तीन ते चार मिनिटे पाणी उकळून घ्या. लिंबाच्या सालीमध्ये उकळून घेतलेले पाणी घाला. त्यामध्ये दुसरी वस्तू जी खूप उपयुक्त आहे. किचन मध्ये त्याचा आपण नियमित वापर करतो. दुसरी वस्तू जीरे आहे. जीरे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. जिरे आपल्या शरीरातील मेटाबोलिस म वाढवते. त्यामध्ये एक चमचा जिरे घाला.

आपल्या शरीराला जीरा मुळे पोषक तत्व मिळतात. जिरे आपल्या शरीरातील हाडे मजबूत आणि घट्ट बनवतात. त्यानंतर उकळलेले पाणी एकजीव करा. हे पेय दहा मिनिट तसेच ठेवा. हे पाणी गरम प्या. कोणतेही वजन कमी करण्याचे पेय एक एक घोट प्यायचे. जेवण देखील थोडे थोडे सेवन करायचे.

थोडे अंतर ठेवल्यास पचन क्रिया उत्तम राहते. दिवसामध्ये आठ ते दहा ग्लास पाणी प्या. साखर पदार्थ म्हणजे गोड पदार्थ खाणे टाळा. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी याचे सेवन करा. गुळ आणि खडी साखर यांचे सेवन करू नका. गव्हाचे पदार्थ खाणे टाळा. यामुळे वजन वाढते.

लिंबू, जिरे, आणि गरम पाणी तुम्हाला रिकाम्या पोटी घ्यायचे आहे. यामुळे चरबी विरघळून जाते. यामध्ये तुम्ही मध देखील वापरू शकता. हे पेय दिवसातून दोनदा सेवन करायचे आहे. यामुळे वजन नक्की कमी करण्यासाठी मोलाची मदत होते. हा घरगुती उपाय आहे. सलग काही दिवस हा उपाय करून पहा. त्याच बरोबर योगासन आणि व्यायाम देखील करून पहा. वजन लगेच कमी होवून स्थिर प्रमाणात येईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *