नमस्कार मित्रांनो,

आपल्या पैकी बऱ्याच व्यक्तींना दिवसभर काम केल्याने खूप थकवा येतो शरीर इतके थकते की उठायला देखील होत नाही. नेहमी शरीर थकल्या सारखे वाटत असेल, अन्नपचन होत नसेल किंवा नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तसेच कधी-कधी तर पोहे व चहा पिलात तर लगेच ऍसिडिटीचा त्रास होतो.

या सर्वांवर आजचा उपाय अत्यंत गुणकारी आहे. हा उपाय अगदी सगळ्यांना करता येण्याजोगा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे खजूर, खजूर हे पोषकद्रव्याने भरलेले असतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, अमिनोऍसिड खूप मोठ्या प्रमाणात असतात. खजूर मध्ये फॅट खूप कमी प्रमाणात असतो साधारणतः अर्धा ग्रॅम फॅट असतो.

खजूर हा अँटी एजिंग म्हणून काम करतो जो शरीराला म्हातारपण येऊ देत नाही. खजूर मध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रक्त वाढण्यासाठी याची नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे खजूर अन्नपच करण्यासाठी सुद्धा मदत करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे खजूर खाणाऱ्या व्यक्तीचे पित्त कमी होते. तर आज आपण याचाच वापर पाहणार आहोत.

तर संध्याकाळच्या वेळी अर्धी वाटी पाणी घ्या आणि त्यात 3 खजूर बिया काढून वाटीत टाकून ठेवा. आता हे पाण्यात टाकलेले खजूर रात्रभर राहू द्यायच्या आणि सकाळी हे खजुर भिजून फुगतील हे फुगलेले खजूर याच पाण्यात कुचकरायचे आहेत आणि बारीक करायच्या आहेत.

आता हे मिश्रण चाळणी च्या मदतीने गाळून घ्या आणि हा जो सार आहे बाजूला काढून घ्या. यानंतर या मिश्रणात 1 चमचा मध टाकून हे मिश्रण सेवन करा. ज्या व्यक्तींना शुगरचा त्रास असेल त्यांनी मध वापरू नये फक्त खजूर वापराव्यात.

हा उपाय आपल्याला रोज सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. फक्त 7 दिवसात तुम्हाला परिणाम दिसू लागतील. आशा प्रकारे हा उपाय केलात तर आपल्या शरीरात एक नवचैतन्य, नवकांति येईल आणि म्हातारपण लवकर येणार नाही व पित्ताचा त्रास ही कमी होतो.

तसेच शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. पोटाच्या स-मस्या दूर होतात. ज्यांना लॅपटॉप, कॉम्प्युटर वरती सतत काम असते त्यांनी रोज तूप आहारात ठेवलेच पाहिजे. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉ के ज असल्यास शुद्ध तूप लु ब्रि कें ट चे काम करते.

गॅसेसचा त्रा स कमी करण्यासाठी तुप खुप फा-यदेशीर ठरतं. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रा स कमी होतो. शुद्ध तुपामुळे त्वचा तजेल आणि मऊ राहते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *