नमस्कार मित्रांनो,
तुळशीचं रोपटं जेंव्हा थोडं मोठं होत तेंव्हा त्याच्या काही काड्या वाळतात या काड्यांना तुळशीकाष्ठ म्हंटलं जातं. ज्या घरात माता तुळशीची मनोभावे पूजा केली जाते तसेच दररोज सांयकाळी दिवा लावला जातो त्या घरात नेहमी सुख-समृद्धी नांदते. तुळशीच्या रोपट्याचा वाळलेल्या काड्यामध्ये अनेक दैवीय गुणधर्म असतात.
तर या वाळलेल्या काड्या तुळशीच्या रोपट्याला कोणतीही इजा न पोहचवता व्यवस्थित काढून घ्या. या लाकडांची आपण बारीक पूड करून घ्या. आणि हे पूड गोपीचंदनामध्ये व्यवस्थित मिसळून दररोज देवपूजा करताना श्री हरी विष्णूंना या मिश्रणाने आपण तिलक करा. तुम्हाला बाजारामध्ये किंवा पूजेच्या दुकानात गोपी चंदन नक्की मिळेल.
तर भगवान श्री हरी विष्णूंना हा तिलक केल्यानंतर आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत स्त्री असो किंवा पुरुष सर्वांच्या माथी या मिश्रणाचा तिलक नक्की करा. यामुळे जन्मोजन्मीचे पाप आणि कष्ट नष्ट होतात. ज्यांना हे दररोज करणं शक्य होणार नाही त्यांनी किमान प्रत्येक गुरुवारी तर हा उपाय आवश्य करावा. गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंचा आहे.
सोबतच आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला खूप राग येत असेल किंवा चिडचिड करतो किंवा एखादी व्यक्ती सतत दुःखी राहते चिंता करते व कामामध्ये मन लागत नाही. अशा व्यक्तींना सुद्धा या मिश्रणाचा तिलक नक्की लावत चला. भगवान श्री हरी विष्णूंचे नामस्मरण करत चला ‘ऊँ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करत चला. तसेच ज्यांची बुद्धी काम करत नाही आशा लोकांनी सुद्धा हा उपाय करण्यास हरकत नाही.
जर भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा तुमच्या देवघरात नसेल तर तो नक्की स्थापित करा. कारण श्री हरी विष्णू या जगाचे पालनहारता आहेत त्याच्यावरच ही संपूर्ण सृष्टी अवलंबून आहे.
आपल्या घरात ज्यांचा मृत्यू होतो त्यांना आपण पितृ असे म्हणतो. या पितृच्या आत्म्यास शांती प्रदान करण्याच पितृ देवता म्हणून प्रत्येक्ष भगवान श्री हरी विष्णू करतात. आणि म्हणून त्यांचं पूजन हे फार महत्वाचे आहे. तर हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करून पहा