आपल्या हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्व आहे. ज्या घरामध्ये पितृची सेवा होते त्या घरात पितृ तृप्त असतात. मात्र ज्या घरामध्ये पितृची सेवा अजिबात होत नाही. तिथे विवाह समस्या संतती समस्या आणि नौकरी, व्यवसायात अपयश आशा अनेक समस्या उद्भवतात तसेच आर्थिक चणचण घरात कटकटी भांडणे होणे हे सर्व पितृ दोषाची लक्षणे आहेत.

म्हणून पितृच्या शांती साठी आपण अन्नदान व पिंडदान असे अनेक विधी करतो. आज आपण असाच एका साधा व सोपा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय आपल्याला सर्वपित्री अमावास्या दिवशी करायचा आहे. सर्वपित्री अमावस्या हा पितृ पक्षातील अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी सर्व पितृ मुक्त संचार करत असतात त्यामुळे या दिवशी जी आपण पितृची सेवा करू किंवा उपाय कराल याने पितृ लवकर संतुष्ट होतात.

हा उपाय पितृ आमावस्या दिवशी जेवण करण्याआधी करायचा आहे. जेव्हा घरातील महिला दुपारी जेवण बनवताना कणीक मळत असताना त्यात मीठ टाकू नका. तसेच जे तुम्ही पहिली पोळी बनवत असताना त्यात थोडी साखर किंवा गुळ टाकून पोळी बनवावी आणि ही पहिली पोळी कुत्र्याला द्यावी. कुत्र्याला पोळी देत असताना मनोभावे आपल्या पितृचे स्मरण करा.

पाण्यात थोडे गाईचे कचे दूध टाका व स्नान करा. हिंदू धर्मामध्ये सांगितलं की गोमाता, कुत्रा आणि कावळा आहेत यांना आपण काही ना काही वस्तू खाऊ घाला त्याची सेवा करा. त्यांच्या रूपाने आपले पितर हे प्रसन्न होतील. आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला असतो आपल्या आई असेल आपले वडील असतील आपले जे काही पूर्वज आहे लहानांपासून थोरांपर्यंत आजी-आजोबा असतील हे आपले पितर असतात. ते कोणत्याही रुपात आपल्याकडे येत असतात.

तसेच अजून एक उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा एखादी आसन वगैरे काहीतरी टाका आणि दक्षिण दिशेकडे पाहत आपल्या पितरांचे स्मरण करत ओम श्री पितृ देवाय नमः या मंत्राचा जप करा. पिंपळाच्या झाडाखाली जाणार असाल तर जाताना शक्यतो सकाळी सकाळी ह्या सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी ही गोष्ट करा.

जाताना तांब्याभर पाणी घ्या त्या पाण्यामध्ये आपण थोडं गाईचं कच्च दूध टाका आणि दोन चमचे थोडेसे टाका आणि पिंपळाच्या वृक्षाला जाताना शक्यतो सफेद रंगाची वस्त्रे नाद करा श्वेत वस्त्र असा पण त्याला म्हणतो तर जाताना आपण सफेद रंगाचे वस्त्र परिधान करा. ही सर्व सामग्री घेऊन आपण वृक्षाखाली जायचा आहे आणि हे जल आपल्या पितरांचे नाव घेत पितरांचे स्मरण करावे या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचा आहे. हात जोडून प्रार्थना करायचे आहे.

हा उपाय आपण सर्वपित्री अमावास्याला नक्की करून पहा व पितरांची सेवा करा. वर्षभरात आपली अडलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि आपल्या घरात सर्व गोष्टींची भरभराट होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या