नमस्कार मित्रांनो, सध्या पितृपक्ष चालू आहे आता सर्वपित्री दर्श अमावस्या असेल भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला सर्वपित्री दर्श अमावस्या म्हटले जाते या दिवशी पितृतर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते शास्त्रानुसार या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या म्हणजे मोक्ष प्रदान करणारी अमावस्या ही म्हटले जाते.

हे तिथी व्यक्तीच्या जन्मकुंडलीत निर्माण झालेल्या पितृ दोषा पासून मुक्ती देण्याबरोबरच तर्पण पिंडदान व श्राद्धासाठी अक्षय पुण्यदायी मानले जाते सर्वपित्री दर्श अमावस्या २५ सप्टेंबरला असणार आहे सर्वपित्री अमावस्या पितरांचे श्राद्ध पक्षाची सर्वात शेवटची तिथी आहे या दिवशी त्या सर्वांचे पित्र व श्राद्ध केले जाते

ज्यांचे प्राद्ध टाकणारे कोणी नसते किंवा कोणी करीत नाही त्याशिवाय त्यांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसेल त्यांचेही श्राद्ध तर्पण या तिथीलाच केले जाते त्यांचा अकाली मृत्यू झाला असेल त्यांची ही श्राध्द या दिवशी करतात पितृतर्पण करताना या दिवशी काही विशेष उपाय केल्यास आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो व जीवनभर आयुष्यात सुख-समृद्धी येत राहते

हिंदू धर्मात पितरांच्या मुक्तीसाठी सर्वपित्री अमावस्येला खूप खास मानले गेले आहे असे म्हणतात की काही अडचण असेल किंवा कोणत्याही कारणाने आपण आपल्या पित्रांच्या तिथीला श्राद्ध तर्पण केले नाही तर सर्वपित्री अमावस्येला श्राध्द व तर्पण करावे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी विसर पडलेले आपले जुने पुरवत सर्वांसाठी तर्पण व पिंडदान करून श्राद्ध करतात

हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो सर्वपित्री अमावस्येला संध्याकाळी आपल्या पूर्वजांना निरोप देण्याचे ध्यान करावे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत व पितरांसाठी श्राद्ध करावे आपल्या पूर्वजांसाठी तर्पण व पिंडदान करणे हे घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आद्यकर्तव्य आहे

घरातील जे जेष्ठ सदस्य असतील त्यांनी तर्पण व पिंडदान करावे पितरांना तर्पण करतांना भात, जव, काळे तीळ पाणी यांचे मिश्रण करून त्यांचे पिंड बनवावे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सर्वात आधी श्राद्धाचे भोजन कावळा, गाय व कुत्रा यांना द्यावे अशी मान्यता आहे की आपले पित्र कावळा गाय किंवा कुत्र्याचे रुपात येऊन भोजन ग्रहन करतात

कावळ्याला यम देवांचे दुत मानले जाते या दिवशी गरीब व गरजू लोकांना भोजन व दान दक्षिणा देऊन गरूड पुराणाचे पठण करावे तसेच पितृपक्षाची संबंधित मंत्राचा जप करावा त्याबरोबरच सर्वपित्री दर्श अमावस्याला चांदीच्या वस्तूंचे दान केल्यास आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्या वंशजांना सुखी जीवनाचा आशीर्वाद देतात

या दिवशी संध्याकाळी राईच्या तेलाचा दिवा लावून आपल्या हातात घ्यावा एका तांब्यात पाणी घेऊन घरात चार दिवे लावून उंबरठयावर ठेवावे पित्रांकडे प्रार्थना करावी की आज संध्याकाळ पासून पितृ पक्ष समाप्त होत आहे आता तूम्ही आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या लोकांत परत जावे तुम्ही आमच्या सर्वांवर वर्षभर तुमचा आशीर्वाद अशाच राहुद्या

आणि तुमचे आशीर्वादाने घरात मंगलमय वातावरण असूद्या असे म्हणून हातातील दिवा व एक तांब्या पाणी मंदिरात ठेऊन जावे तेथे जाऊन तो दिवा श्री हरिंच्या मूर्तीसमोर ठेवावा व ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे अशा प्रकारे पित्रांना निरोप द्यावा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या