नमस्कार मित्रांनो,
आज आपण संख्याशास्त्रातील सर्वात शक्तिशाली आणि अत्यंत पॉवरफुल अश्या क्रमांका बद्दल म्हणजेच 108 या क्रमांका विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा नंबर एका खास ठिकाणी लिहिण्याचा अर्थ असा आहे की या नंबरचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो.
या 108 क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला हवे ते साध्य करू शकता. 108 नंबर लिहून तुमची कोणतीही इच्छा कशी पूर्ण करायची असा प्रश्न आता अनेक लोकांना पडत असेल. तर मित्रांनो, या निसर्गात इतकी रहस्ये आणि सुप्त शक्ती दडलेल्या आहेत की माणूस आणि आधुनिक विज्ञान अजून देखील तिथे पोहोचलेले नाही आहेत.
तर 108 ही अशीच एक संख्या आहे. मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने आपल्याला त्या मंत्राची शक्ती लक्षात येते. कोणत्याही मंत्राचा 108 वेळा जप केला तर तो मंत्र जिवंत बनतो, हे तर तुम्ही ऐकलच असेल. त्यामुळे कोणतेही काम असेल आणि जर ते आपण सलग १०८ वेळा केले तर ते काम पूर्ण होतेच.
ते जे काही काम असते त्यामधे आपल्याला संपूर्ण सफलता प्राप्त होत असते. मित्रांनो, हा 108 नंबर आला कुठून? तर हा जो 108 क्रमांक आहे त्याची संपूर्ण बेरीज ही 9 येते आणि 9 या संख्यांची बेरीज ही पूर्ण अंक असे मानली जाते. हा 9 अंक मंगळाशी संबंधित आहे. ज्या कोणाच्या कुंडलीत जर मंगळ हा ग्रह उच्च स्थाना मधे असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात मोठे यश मिळत असते.
आज आम्ही जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत तो उपाय वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला आहे. हा उपाय तुम्ही रात्री देखील करू शकत आहात. तर आजचा उपाय हा असा आहे की, आपल्याला 108 हा अंक लिहून काढायचा आहे. यासाठी लागणारे पदार्थ हे पुढीलप्रमाणे असतील: मोहरीचे तेल, कुमकुम आणि एक बारीक तांब्याची काठी किंवा काडी यासाठी आवश्यक आहे.
तांब्याच्या काड्या तुम्हाला सहज सापडतात. तुम्हाला या काडीने हा नंबर लिहायचा आहे. रात्री झोपताना मोहरीचे तेल आणि कुमकुम हे एकत्र करून तुमच्या नाभीच्या बरोबर थोड खाली तांब्याच्या काठीने १०८ क्रमांक लिहा. आपण ते स्वतः किंवा इतर कोणाच्या मदतीने लिहू शकता.
हा उपाय कोणीही पुरुष, स्त्री किंवा वृद्ध व्यक्ती देखील करू शकतात. हा क्रमांक लिहिल्यानंतर तुमची जी इच्छा असेल, मग ती पैसा, संपत्ती किंवा इतर कोणतीही इच्छा असेल, ती तुम्हाला स्मरणात ठेवा. हा अंक लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करायचे आहे. आपल्याला फक्त झोपायचे आहे, सतत तुमच्या इच्छा आणि मनोकामना सतत स्मरण करायची गरज आहे.
मित्रांनो, हा उपाय तुम्ही एक-दोन आठवडे सतत करत राहा. जसजसे तुम्ही पुढे जाल तसतसे तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होत असल्याचे दिसून येणार आहे. तुमची जी काही इच्छा असेल मग ती काहीही असली तरी ती पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे तुम्हाला नक्कीच दिसून येईल. ही गूढ शक्ती तुम्ही नक्कीच वापरून पहा. त्यामुळे नक्कीच फरक पडेल.