नमस्कार, मागचे दोन आठवडे झालं रेश्मा सगळ्यांशी खूप तु’टकपणाने वागत होती. वरवर पाहता सगळं व्यवस्थित चाललं होतं पण तिच्या मनात काही तरी वेगळंच चालू होतं, जे तिला सांगताही येत नव्हतं आणि सहनही होत नव्हतं. कारण घरात तिच्या सासुबाईचं कुमुद ताईचं नुकतंच हार्टच ऑपरेशन झालेलं, त्यामुळे सगळेजण कुमुद ताईचं सगळं व्यवस्थित पार पडे पर्यंत तसे चिंतेतच होते. कुमुद ताई आणि दिनकरराव यांना चार अपत्ये होती, तीन मुली आणि एक मुलगा.

यथावकाश मोठया दोन मुलींची लग्न झाली, त्यानंतर लेकाच लग्न झालं आणि रेश्मा या घरी सून म्हणून आली. रेश्मा आणि विजय दोघेही एकमेकांना साजेसे होते. रेश्मा कुमुदताई च्या सोबत त्यांच्या लेकीप्रमाणे मिसळून गेली, परंतु लहाण्या लेकीला, पल्लवी ला उगाच रेश्माबद्दल असूया वाटायची. हिने माझी जागा घेतली असा भ्रम ती करून बसली होती. कुमुद ताईंनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ होतं.

कालांतराने पल्लवीचं देखील लग्न झालं, तिचं सासर अगदी हाकेच्या अंतरावर होतं, त्यामुळे तीच नेहमी येणं जाणं होत होतं. वर वर पल्लवी रेश्माशी सगळं आलबेल आहे असं दाखवत असली तरी, कुमुदताई च्या नजरेतुन या गोष्टी सुटत नव्हत्या. कुमुदताई मात्र रेश्मावर लेकीप्रमाणेच प्रेम करत होत्या, अगदी तिचं काही चुकलं तर जसं लेकीला रागवत, तसंच तिचाही कान ओढत, त्यामुळे त्या दोघीत खूप छान बॉ-ण्ड तयार झाला होता.

नाही म्हणलं तर पल्लवी तिच्या परीने प्रयत्न करायची दोघींमध्ये दुरावा निर्माण करण्यात, पण मागच्या सात आठ वर्षात तिला काही यश मिळाले नव्हते. पण त्या घटनेनंतर, रेश्माला जाणवले की कुमुदताईनी तिला थोडे अंतर दिले आहे, आणि त्यांच्या या वागण्याने रेश्मा चांगलीच दुखावली होती. त्यादिवशी विजय ऑफिस च्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता, तर दिनकरराव मोठ्या लेकीकडे गेले, कुमुदताईचा हात दुखत होता म्हणून त्यांनी दिनकररावा बरोबर जायचं टाळलं होतं. गोळी घेऊन त्या अराम करत बसल्या होत्या.

रेश्माचं सध्या घरातूनच काम सुरू असल्यामुळे ती घरीच काम करत बसली होती. तेवढ्यात कुमुदताई ना खूप घाम फुटला आणि छातीत कळ यायला लागली. रेश्माने शेजारच्यांच्या मदतीने सासूबाईंना ऍडमिट केलं आणि रस्त्यातूनच पल्लविला हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी फोन केला. पल्लवी देखील लगेच पोहचली. डॉ’क्टरांनी योग्य तो उपचार करून काही टेस्ट करायला सांगितल्या. आणि एक फॉर्म भरून त्यावर सही करायला सांगितली, अशा साठी की गरज पडली तर ऑपरेशन करता यावे म्हणून.

हे सर्व कुमुदताई च्या समोर घडत होते. जसा फॉर्म आला तसा त्यांनी तो भरायला लेकीला खू-ण केली. पल्लवीन जवळपास तो फॉर्म हिसकावूनच घेतला आणि भरला. तोपर्यंत सगळेजण जमले होते. रात्री उशिरा विजय हॉस्पिटलमध्ये पोहचला, त्याला पाहिलं की रेश्माचा बांध फुटला. त्याला घट्ट पकडून ती खूप रडली, विजयला वाटलं की, रेश्मा कदाचित या प्रसंगामुळे थोडी घाबरली असावी म्हणुन तिला रडायला येत असेल.

त्याने तिला समजावले आणि ते दोघेही icu च्या बाहेर बसून राहिले. इकडे रेशमाच्या मनात ही गोष्ट घर करून राहिली की आईंना माझ्यावर विश्वास नव्हता का? इतक्या कठीण प्रसंगात त्यांनी तिला डावलून ,त्यांच्या लेकीला पुढं केलं होतं? म्हणजे आजवर जे प्रेम होते ते खोटं होतं का? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले होते. पण शहानिशा करण्याची ही वेळ नक्कीच नव्हती, हे ती ओळखून होती.

इकडे कुमुदताई ना पण रेशमाच्या वागण्यातला कोरडेपणा जाणवू लागला होता, पण ऑपरेशन झाल्यामुळे त्या थोड्या शांत बसून होत्या. ऑपरेशन नंतर थोडं बरं वाटायला लागल्यावर कुमुदताईनी रविवारी सगळ्या लेकींजावायाना घरी बोलावले. सगळ्यांची जेवणं होऊन सगळेजण गप्पा मा’रत बसले होते, घडला प्रसंग आठवून सगळ्यांनी देवाचे आभार मानले आणि सगळं व्यवस्थित पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

तशा कुमुदताई म्हणाल्या की त्यांना काही सांगायचं आहे, सगळ्यांनी उत्सुकतेने कुमुदताई कडे पाहिलं, त्यावर त्यांनी रेश्माकडे पाहिलं आणि तिला जवळ बोलावलं, तीही थोडी कचरतच त्यांच्या जवळ गेली. त्यांनी तीचा हात हातात घट्ट धरून सांगितलं की आज त्या केवळ तिच्यामुळे जिवंत आहेत, आणि ऑपरेशन च्या आधीची फॉर्म ची घटना सांगितली, त्या म्हणाल्या की त्यांनी तो फॉर्म मुद्दाम पल्लविला सही करायला लावला,

कारण जर ऑपरेशन मध्ये माझं काही बरं वाईट झालं असतं तर, पल्लवीनं कायम तुलाच जबाबदार धरलं असतं, आणि मला हे घडायला नको होते, म्हणून मी जाणीवपूर्वक तिला सही करायला सांगितले. कुमुदताईचं हे वाक्य ऐकल्यावर रेश्मा ढसाढसा रडू लागली आणि त्या अश्रू मध्ये झालेले सगळे गैरसमज दूर झाले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या