नमस्कार मित्रांनो, जेवण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जो पदार्थ पहिल्यांदा येतो तो पदार्थ म्हणजे भात. नैवेद्याच्या ताटात वरण भात तूप हे आवर्जून असते. इतकेच नव्हे तर नैवेद्याचे ताट आपण जेवायला घेतल्यानंतर पहिल्यांदा भात खावा असा प्रघात आहे. डब्याला जरी आपण पोळी-भाजी नेत असलो तरी रात्रीच्या जेवणात तरी सर्वांच्या भात हा नक्कीच असतो.

ज्यांच्याकडे भात शेती केली जाते, अशी लोक खूप प्रमाणात भात खातात असे आढळून आले आहे. पूर्वी शेतातील भात पॉलीश न करता जेवणात वापरला जायचा. पण आता सगळेच तांदूळ पॉलीश केले जातात. आणि असे पॉलिश केलेल्या तांदळाचा भात खाल्ल्याने डायबेटीस, वजन वाढणे असे अनेक आजार उदभवतात.

तांदूळ दोन प्रकारचा असतो. एक हातसडीचा तांदूळ ज्याला ब्राउन राईस म्हणतात तर दुसरा पॉलिश केलेला तांदूळ. हा पॉलिश केलेला तांदूळच आपल्या आरोग्यासाठी घातक असतो. बरेचदा डॉक्टर लोक भात खाऊ नका किंवा भात कमी खा असे सांगत असतात त्यामागे हेच कारण आहे.

हातसडीच्या तांदळात व्हिटॅमिन डी, लोह, फायबर, कॅल्शिअम, थायमीन आणि रायबोफ्लेविन यांची चांगली मात्रा असते. आपल्या आहारात जर हलके पदार्थ असतील तर आपल्या पोटाला आराम भेटतो पण जर आपण जड अन्न झाले जसे की मटण, चिकन नंतर मासे तर आपल्या पोटाला अस जड खाल्याने जाणवत असते.

हातसडीचा तांदूळ पचायला हलका असतो तर पॉलिश केलेला तांदूळ हा जड असतो. त्यामुळे वरील सांगितल्याप्रमाणे जसे मटन चिकन खाल्ल्यानंतर आपल्याला पचनास त्रास होतो तसाच त्रास हा पॉलिश केलेला तांदूळ खाल्ल्याने होत असतो. सतत असे होत राहिल्याने आपली पचन शक्ती कमजोर होऊ लागते.

आणि बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटात मुरडा येणे असे त्रास होऊ लागतात. जे लोक जास्त भात खातात त्यांचे शरीर ठराविक वयात कमजोर पडू लागते. भातात कॅल्शिअम नसते त्यामुळे अशा व्यक्तींची हाडे कमजोर होऊ लागतात. मग प्रश्न असा पडतो भात खाऊच नये का? पण तसे नाही. भाताने लवकर पोट भरते आणि तो बनवणे सुद्धा सोपे असते.

भात नियमित खावाच, पण तो कुकरमध्ये बनवलेला नसावा. कारण कुकर मध्ये बनवलेला भात वर आलेल्या पाण्यातच शिजतो. आणि एखाद्या भांड्यात बनवलेल्या भाताचं पाणी आपण काढून टाकतो. जर शक्य असेल तर खाण्यासाठी हातसडीचा तांदूळ वापरावा.

कुकर मधला भात घातकच कारण कुकर मध्ये त्यातील घातक पदार्थ तसेच राहतात. म्हणूनच शक्यतो टोपातला भात थोड्या प्रमाणात खावा. सोबतच गहू, बाजरी, मका, ज्वारी यांचा सुद्धा आहारात वापर करावा. ज्यामुळे इतर घटक सुद्धा आपल्या शरीराला मिळतील.

मित्रांनो आमचा लेख कसा वाटला आहे कमेंट करुन आम्हाला जरुर कळवा लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *