नेहमी अपचन होते, पोट साफ नसते, गॅसेसचा वारंवार त्रास उद्भवतो. हल्ली या समस्या सामान्य झालेल्या आहेत. आपल्या खाण्या पिण्याच्या चुकीचे सवयी डेअरी, बेकरी पदार्थांचे सेवन यामुळे आपले पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे अशा अपचनाच्या, गॅसच्या स-मस्या आपल्याला उदभवतात.

अपचन, पित्त, गॅसच्या समस्यांपासून सुटका करणारा असा खुप सोपा आणि घरगुती उपाय आम्ही आपणास सांगणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, वेलची, लिंबाचा रस. एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्यायच आहे आणि त्यात एक चमचा जिरे टाकायचे आणि दोन इलायची त्या इलायचीला थोड बारीक पावडर करून त्यात टाकायच आहे.

आता हे भांडं गॅस वर ठेऊन चांगले उकळून घ्या. काढा उकळून झाल्यावर तो काढा एका ग्लास मध्ये गाळून घ्यायचे आहे. नंतर त्या काढ्यात 5 मिली इतका लिंबाचा रस त्यात टाकायकचा आता आपले मिश्रण तयार होईल. हा काडा रोज रात्री जेवणानंतर सेवन करायचा आहे.

हा काढा पिल्याने तुमची पचनशक्ती वाढेल व पचनाविषयी कोणती समस्या असतील त्या पूर्ण पणे बऱ्या होण्यास मदत होईल. या बरोबर पोट सुद्धा साफ राहील आणि गॅसेसच्या समस्या आहेत त्या देखील निघून जातील व पोट स्वच्छ राहून पोटाचे विकार पूर्ण पणे बरे होण्यास मदत होते.

आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी पोटाचं कार्य सुरळीत चालणे गरजेचं आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्यं, डाळी, सुका मेवा, पचनाला हलके असणारी धान्य यांचा समावेश करावा. अँसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी बडीशेप, काकडीची कोशिंबीर, धणे घातलेला चहा, कोकम सरबत प्यावं.

नेहमी कोमट पाणी प्यावे त्यामुळे पोटाच्या समस्या राहणार नाहीत. हिंग, बडीशेप, जिरे यामध्ये गॅस कमी करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असल्यानं त्यांचं नियमित सेवन करावे. योग किंवा व्यायाम नियमित केल्यानं पचनक्रिया सुरळीत होते. रोज किमान दहा मिनिटे व्यायाम केला पाहिजे. याशिवाय चालणे, पोहणे, सूर्यनमस्कार हेही चांगले व्यायाम आहेत. व्यायामाने पोट ठीक राहण्यासाठी बरोबरच आपली प्रकृतीही सुदृढ, निरोगी राहते.

जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप महत्त्वाचे आहे. हे जरी कठीण असलं तरी अशक्य नाही. शरीराला शिस्त लावण्यासाठी सर्वात आधी जेवणाच्या योग्य वेळांचं पालन करा. जिरं खाल्ल्यानं पाचनक्रियेशी सं-बंधित समस्या दूर होतात. म्हणून जेव्हा आपल्याला गॅसची समस्या असेल, तेव्हा एक चमचा जिरे पावडर थंड्या पाण्यात घोळून प्या, खूप फायदा होईल.

मित्रांनो ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या मित्र- मैत्रिणींबरोबर नक्की शे’यर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *