नमस्कार मित्रांनो,
पाण्यानी भरलेला माठ घरात योग्य दिशेला ठेवल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात. माठातील पाणी पिल्याने केवळ शारीरिक आरोग्य चांगले राहते असे नाही. तर घरातील व्यक्तीला वारंवार एखाद टेन्शन असेल किंवा मानसिक आजार असतील तर हे देखील दूर होतात. सोबतच घरात भांडणे होत असतील तर हे देखील याने शांत होतात. यासाठी पाण्याचा माठ नक्की कधी खरेदी करावा व त्या माठाची घरात कोणत्या कोपऱ्यात स्थापना करावी.
तसेच सर्व वास्तुदोष कमी करण्यासाठी आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी या माठाचे कोणकोणते प्रभावी उपाय आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या घरात माठ नक्की खरेदी करा आपल्या घरात माठ नक्की असावा. कोणत्याही शुभ मुहूर्तावर सोमवारच्या दिवशी आपण पाण्याचा माठ खरेदी करा. कारण आपण माठात पाणी भरतो व पाण्याचा सं-बंध चंद्राशी आहे चंद्राचा वार सोमवार आहे.
तसेच सोमवारी केलेली माठाची खरेदी आपल्यासाठी शुभ ठरते. माठ घरी आणल्यानंतर त्याचा ताबडतोब वापर सुरू करू नका. सोमवारी खरेदी करा दिवसभर त्या माठाला पाण्यानी भरून ठेवा व रात्री हळदी कुंकू लावा पूजा करा त्यानंतर आपण त्यात पिण्याचे पाणी भरून वापर करू शकता. आशा प्रकारे आपण पाण्याचा माठ आपल्या घरामध्ये आणला तर तो आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी ठरतो.
आता पाण्याचा माठ नेमका कोणत्या ठिकाणी ठेवावा तर त्यासाठीची उत्तम दिशा आहे ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशेला आपण पाण्याचा माठ ठेऊन द्या. याने घरातील वास्तुदोष दूर होतात घरातील वातावरण आनंदी राहत तसेच घरातील अनेक समस्या दूर होतात. आपल्या घरात जर पैसा कधीच कमी पडू नये अस वाटत असेल तर हा माठ सतत भरलेला राहील याची काळजी घ्या.
माठातील पाणी अर्ध्याच्या वर राहील याची काळजी घेतली तर घरात पैश्याची कमतरता कधीच जाणवत नाही. जर माठाच्या बुढाला आपण चांदीचा सिक्का चिटकवला तर त्याने सुद्धा खूप फायदे होतात असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. ज्या लोकांना मानसिक त्रास असतो त्या लोकांना माठातल पाणी प्यायला द्या. अनेकजण रागाच्या भरामध्ये माठ फोडतात हे अत्यंत अशुभ मानण्यात येते. माठ केव्हाच फोडू नये खराब झाला किंवा तडकला तर तो आपल्या हातानी फोडू नका.
त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकजण त्याला कचऱ्यामध्ये फेकून देतात तेही अत्यंत अयोग्य आहे. यामुळे आपल्या माथी अनेक दोष लागतात आणि घरामध्ये वादविवाद, क्लेश, अशांती तसेच अनेक प्रकारचे संकटे आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. आपण माठ टाकून देण्या ऐवजी त्यात झाडे लावू शकता. जर तुमच्या घरात सतत भांडणे होतात तर एक छोटीशी गोष्ट आपण करा.
या पाण्याच्या माठाजवळ 7 दिवस मातीच्या दिव्यात तेलाचा दिवा लावा. आणि हात जोडून आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी कटकटी दूर व्हाव्यात आणि घरातील पैश्याची अडचण असेल तर ती दूर व्हावी यासाठी प्रार्थना करा. अशी मान्यता आहे की पाण्याच्या मठात आपले पितृ वास करतात. आणि म्हणून एक विशिष्ट दिवशी विशिष्ट मुहूर्तावर या पाण्याने भरलेल्या माठाचे दान करावे याने आपले पितृ संतुष्ट होतात. दान करताना त्या पाण्यानी भरलेल्या मठात सुपारी, अक्षदा, सिक्का टाकून आपण माठ दान करावे.