नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या पायांवर पेडिक्युअर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. ट्रीटमेंट घेत असतो म्हणूनच आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे पाय नैसर्गिकरित्या चमकदार आणि मुलायम होतील. तुम्हाला महागड्या ट्रीटमेंट देखील कराव्या लागणार नाहीत त्याच बरोबर तुमचा पार्लरचा खर्च वाचेल. आपल्या पायांवर डेड स्कीन असते ती निघून जाईल.

पाय चमकदार दिसू लागतील आणि हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला घरातील शुल्लक गोष्टींचा वापर करायचा आहे, अशा गोष्टींचा वापर करायचा आहे जे आपण रोजच्या आयुष्यामध्ये वापरत असतो आणि या गोष्टीमुळे तुम्हाला फारसा खर्च देखील होणार नाही तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणते घरगुती सामग्री लागणार आहे.

सर्वप्रथम आपल्याला हा उपाय जेव्हा आपण अंघोळीसाठी जाऊ तेव्हा करायचा आहे कारण की आपण पाय तिथे चांगल्या पद्धतीने धुवू शकतो त्यासाठी हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला एक मोठे पात्र घ्यायचे आहे. कोणताही मोठा टब देखील तुम्ही घेऊ शकता. असा टब घ्या ज्यामध्ये तुम्ही तुमचे दोन्ही पाय बुडवून ठेवू शकता. त्यानंतर या टब मध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचे आहे.हे गरम पाणी तेवढे गरम घ्यायचे आहे जेवढे आपल्या पायांना आपण सहन करू शकू.

नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कोणत्याही प्रकारचा शाम्पू. हा शाम्पू तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. शाम्पू चे एक पाकीट एका वेळेसाठी भरपूर होईल त्यामुळे इथे एका पाकेट असाच वापर करावा. शाम्पू मुळे आपले पाय अधिक स्वच्छ होण्यास मदत होईल त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे लिंबू. लिंबू हे एका क्लेंजर सारखे काम करते.

त्यामुळे आपला शरीरावरील डेड स्कीन निघून जाण्यासाठीचे काम हे लिंबू करेल त्यामुळे आपल्याला येथे एका लिंबाचा वापर करायचा आहे. त्यानंतर शेवटची गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे एक चमचा मीठ. मीठ आपल्या त्वचेवरील बारीक किटाणू मारण्यासाठी मदत करते. जर आपल्या पायामध्ये चिरा,भेगा पडल्या असतील तर मीठ टाकून पाठवल्यानंतर त्याला आराम मिळेल.

आपण येथे मिठाचा वापर यासाठी करत आहोत कि गरम पाण्यामध्ये आणि या उपायांमध्ये मीठ टाकल्यावर आपल्या पायाला आराम मिळतो पाय अधिक मुलायम होण्यास मदत होते. आता या पाण्यामध्ये आपल्याला पाच ते दहा मिनिटे आपले पाय बुडवून ठेवायचे आहेत जेणेकरून यामधील टाकलेले सर्व घटक आपल्या पायांवर काम करायला सुरुवात करतील.

पाच ते दहा मिनिटात नंतर तुम्हाला तुमच्या पायामधला फरक आपोआप दिसून येईल. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आठवडा मधून तीन वेळा हा उपाय करू शकता यामुळे आपल्या शरीरावर किंवा आपल्या त्वचेवर काही वाईट परिणाम होणार नाहीत पण उलट आपल्या पायांवर किटाणू असतील, पायांना भेगा पडलेल्या असतील अशा प्रकारचे सर्व त्रास निघून जातील.

सोबतच तुमच्या पायांना आराम मिळेल आणि जेणेकरून तुम्हाला पार्लर किंवा बाहेर कोणतीही मोठी ट्रीटमेंट करावी लागणार नाही. फक्त शुल्लक खर्चा मध्ये तुमचे काम होऊन जाईल. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *