प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं आपला चेहरा उजळ लख्ख गोरा असावा असे वाटत असते यासाठी अनेक स्त्री-पुरुष पार्लरमध्ये जाऊन वारेमाप खर्च करत असतात प्रत्येकाला हा खर्च परवडणारा नसतो किंवा बऱ्याच लोकांना त्यासाठी वेळही नसतो. म्हणूनच आपणा सर्वांसाठी आम्ही घेवून आलो आहोत एक खूपच सोपा घरगुती उपाय.

हे आपल्या चेहऱ्यासाठी खास असून यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग धब्बे, वांगाचे डाग हे सर्व कमी होणार आहे. काही दिवसांमध्ये तुमचा चेहरा गोरापान आणि टवटवीत दिसू लागेल. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल. या उपायासाठी आपणाला सर्वप्रथम लागणार आहे ती साखर. कुणालाही सहजासहजी उपलब्ध होते. साखर ही मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये साधारण मध्यम स्वरूपात बारीक करून घ्यायची आहे.

चेहऱ्याच्या आरोग्यासाठी साखर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेल सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरी सहज उपलब्ध होते तसेच यातील अनेक फायदे सुद्धा आहे.या तेलामुळे आपली त्वचा कोमल व मुलायम बनते आणि म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या घरात अनेकजण खोबरेल तेलाचा जास्त प्रमाणामध्ये वापर करत असतात.

आपण जी मध्यम स्वरूपाची साखरेचे पावडर बनवलेली आहे त्या पावडर मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे खोबरेल तेल टाकायचं आहे. या दिवसांमध्ये वातावरणामध्ये गारवा असल्याने अनेकदा तेल गोठून जाते आणि म्हणूनच थोडेसे उन्हामध्ये ठेवल्यानंतर आपल्या ला हे तेल घ्यायचे आहे या तेलात असे अनेक औ’षधी गुणधर्म असतात जी आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी मदत करते तसेच आपली त्वचा कडक झालेली आहे ती त्वचा नरम होण्यासाठी सुद्धा मदत करत असते.

आता शेवटचा पदार्थ म्हणजे लिंबू किंवा लिंबाचा रस. एका लिंबाचा रस या मिश्रणात आपल्याला घालायचा आहे. लिंबाच्या रसामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी म्हणून काम करतात तसेच लिंबू मध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरावरील काळे डाग पिंपल्स वांग , नको असलेले डाग ,सुरकुत्या असल्यास त्या पूर्णपणे दूर करतात.

अशा प्रकारे हे सगळे मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे चेहऱ्याला लावल्यानंतर सात ते आठ मिनिटे हलकासा मसाज करायचा आहे यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील जे काही मृतपेशी का आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जातील आणि तुमची त्वचा अगदी गोरीपान होऊन टवटवीत दिसू लागेल आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केला तर तुम्हाला थोडा फरक दिसायला लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *