आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, की ज्यामुळे तुमच्या केसांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल. तसेच या उपायाने तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत होतील आणि या उपायासाठी तुम्हाला फक्त 5 रुपये लागणार आहेत, या उपायाने तयार केलेलं मिश्रण तुम्ही केसांना लावल्यास तुमच्या केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढू लागेल. केस गळणे पुर्णपणे थांबेल आणि तुमच्या केसांना मजबुती मिळेल.
तर असा हा चमत्कारिक मिश्रण तयार करण्यासाठी तुम्हाला इथे फक्त 3 गोष्टी वापरायच्या आहेत. यातील पहिली वस्तू म्हणजे खाऊची पाने लागणार आहेत, जी तुम्हाला कोणत्याही पान दुकानात सहज उपलब्ध होतील. कारण खाऊचे पान हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्य, सौंदर्ययासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. याशिवाय तुमच्या केसांसाठी फायदेशीर मानले जाते. मग हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हे 1 पान घेवून पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि मग या पानांचे छोटे छोटे तुकडे करून घ्या.
याशिवाय ज्या लोकांचे केस पातळ आहेत, आणि ते केसांना दाट आणि मजबूत करण्यासाठी , त्यानी या पानाचा वापर आवश्य करावा. त्यामुळे केस गळण्याची समस्या, केसातील कोंडा संपण्याची समस्या दूर करण्यासाठी खाऊचे पान खूप फायदेशीर मानले जाते. तर तुम्ही त्या पानांचे तुकडे करून घ्या आणि ते एका वाटीमध्ये टाका. तसेच तुम्हाला येथे दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कच्चा लसूण. कारण लसूण हा केस गळती थांबवण्यासाठी अत्यंत आवश्यक मानला जातो.
कारण यामध्ये असे काही केसांना आवश्यक जीवनसत्त्वे आहेत, जे केस गळणे थांबवण्यास मदत करीत असतात. कारण आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा सूर्यप्रकाशामुळे आपले केस खराब होण्याचे शक्यता असते, त्यामुळे केस गळत होण्याची भीती असते. त्यामुळे या उपायांमध्ये लसूणचा वापर करायचा आहे. कारण यामुळे केसांमध्ये चमक आणि चकाकी येण्यास सुरुवात होते. याचबरोबर हा लसूण पेस्ट लावण्यास केस काळे होण्यास सुरुवात होतात. तर तुम्हाला या उपायामध्ये लसणाच्या 4 कच्च्या पाकळ्या घ्यायच्या आहेत.
तिसरी वस्तू जी आपल्याला या मिश्रणात घायची आहे ती म्हणजे मेथी दाणा होय. ज्या प्रकारे प्रोटीन आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करते, त्याचप्रमाणे हे मेथी दाणे आपल्या केसांना मजबूत करण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तसेच यामध्ये एक असे प्रोटीन आढळते जे आपल्या केसाना अत्यंत आवश्यक मानले जाते आणि त्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केसांची लांबी 2 पट वेगाने वाढू लागते.
तर हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला 1 भांडे घायचे आहे आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात नारळाचे तेल टाकायचे आहे. तसेच हे मिश्रण एकदाच जास्त प्रमाणात करून घ्या जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा मिश्रण करावे लागणार नाही. मग यानंतर साधारण दोन ते अडीच चमचे मेथीचे दाणे या तेलात टाकायचे आहेत. त्याच वेळी त्यामध्ये लसूण आणि खाऊच्या पानांचे लहान केलेले तुकडे टाका. मग मंद आचेवर याला तोपर्यंत भाजा की जोपर्यंत लसूण आणि पान लालसर होत नाहीत.
मग ते जसजसे शिजु लागतील, तसतसे त्याचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. मग आपले हे तेल तयार होईल. मग ते तेल थंड झाल्यावर गाळून एका भांड्यात काढून घ्या. आपले तेल चांगले तयार झाले आहे. मग आता ते ठेवण्यासाठी एक काचेचे भांडे वापरावे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणतेही तेल बनवण्यापेक्षा ते कसे लावायचे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण कोणत्याही तेलाचे फायदे फक्त तेव्हाच दिसतील जेव्हा ते योग्य प्रकारे लावले जाईल.
मात्र हे तेल लावण्यापूर्वी तुम्हाला 2 गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, पहिली गोष्ट म्हणजे आधीपासून तुमच्या केसांना तेल लावलेले नसावे आणि दुसरे म्हणजे जेव्हा तुम्हाला हा तेल लावायचे आहे तेव्हा ते तेल चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यावे. मग हे तेल लावतांना आपल्या केसांच्या लांबीनुसार घ्या. जर तुमचे केस लहान असेल तर हे तेल 1 चमचा घ्या.
जर तुम्ही मुलगी असाल किंवा तुमचे केस लांब असतील तर तुम्ही हे तेल 2 चमचे घ्या. हे तेल केसांना लावण्यापूर्वी तुमच्या केसांच्या मुळांना या तेलाने योग्य प्रकारे मसाज करावे. येथे तुम्ही बोटांच्या साहाय्याने केसांच्या मुळांमध्ये हे तेल लावा आणि हलक्या हातांनी ते मसाज करा. मग बाकी केसांना लावा. कारण कोणत्याही तेलाचा परिणाम तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्या केसांच्या मुळापर्यत त्याचा वापर करतो.
हे तेल तुम्ही आठवड्यातुन 2 वेळा लावावे. तसेच जर तुमचे केस खूप गळत असतील तर आठवड्यातून 3 वेळा केसांना लावावे आणि लावल्यानंतर 1 तासानंतर केस शॅम्पूने धुवा. 3 ते 4 वेळा तेल लावल्यानंतर तुमचे केस गळणे पूर्णपणे थांबेल आणि ते 2 आठवडे लावल्यानंतरच तुमचे केस गळणे कमी करेल. तसेच तुमचे केसांची लांबी 2 पट वेगाने वाढू लागेल.