प्रिय मित्र मैत्रिणींनो, प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर छोट्या प्रकारचे म्हणजे काळे डाग असतात आणि हे काळे डाग घालवण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत. विशेषतः हे असे डाग स्त्रियांच्या मानेवर असतात आणि हे काळपटपणाचे डाग असतात आणि हे घालवण्यासाठी स्त्रिया खूप प्रयत्न करत असतात.

तर तुम्हाला अश्या प्रकारच्या घरगुती उपायाने हे डाग घालवता येते अनेकजण आपला चेहरा चमकवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात पण तुमच्या मानेवर जर काळपटपणा असेल तर काळपटपणा घालवण्याकडे तुमचे लक्ष नसते आणि याच काळ्या मानेने तुम्हाला अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो.

तर हे काळे चट्टे घालवण्यासाठी काय केले पाहिजे हे आज आपण पहाणार आहे. यात पहिला पदार्थ आहे बेकिंग सोडा 2 चमचे बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्याचे मिश्रण तयार करून घ्या आणि हे मिश्रण जिथे काळे डाग आहेत त्यावर हे मिश्रण लावून 30 मिनिटे ठेवायचे आणि थंड पाण्याने धुवून घ्या.

दुसरा उपाय आहे तुम्हाला एक कच्ची पपई घ्यायची आहे आणि पपईचा जाडसर तुकडा करून घ्या आणि त्या तुकड्यावर गुलाबजल व दही याचे चांगले मिश्रण करून घ्या आणि हे मिश्रण मानेवर पपईच्या तुकड्याच्या साह्याने लावून घ्या व 20 मिनीटांनी धुवून घ्या असे केल्यानंतर सुद्धा तुमच्या मानेवरचे काळपटपणाचे डाग निघून जातील.

यानंतर तिसरा उपाय आहे लिंबू आणि मध यांचे मिश्रण करून आणि हे मिश्रन तुमच्या मानेवर अंघोळीच्या आधी लावून घ्या आणि 30 मिनीटांनी अंघोळ करताना तुमची मान स्वच्छ धुवून घ्या या उपायाने काही दिवसातच तुम्हाला फरक दिसेल. आणि अजून एक उपाय आहे लिंबूमध्ये विटामिन सी असत त्यामुळे ते नॅचरल ब्लिच सारख काम करत

आणि अंघोळ करताना हे लिंबू हळुवारपणे तुमच्या मानेवर घासा हे जर लिंबू तुमच्या मानेवर घा’सले तर तुमच्या मानेवरील काळपटपणाचे जे डाग आहेत ते डाग निघून जाण्यासाठी मदत होईल. बेकिंग सोडा मानेवरील काळी परत हटविण्यास प्रभावी ठरेल. आपल्याला 1 चमचा पाण्यासोबत 2 चमचे बेकिंग सोडा मिसळून आपल्या मानेवर लावायचे आहे.

नंतर हे वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा अमलात आणा. कोरफड त्वचेला उत्तम रिझल्ट देतं. कोरफडीचा रस मानेवर लावून अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने मान धुऊन टाका. हे क्रम रोज करा आपल्या उत्तम परिणाम हाती लागतील. वरील कोणताही उपाय करून तुम्ही तुमच्या मानेवरील काळे डाग घालवू शकतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या