नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक तरुणाचे लग्न करण्याचे स्वप्न असते. पण लग्न करत असताना तोही थोडा घाबरलेला असतो. कुठेतरी चुकीची बायको सापडली तर त्याचं आयुष्य संपूर्ण उ’द्ध्वस्त होऊ शकतं, असं त्याला वाटतं. आपल्याला मुलगी कशी मिळेल, तिचे वागणे कसे असेल याचा सतत त्याच्या मनामध्ये विचार येत असतो. म्हणूनच म्हटले जाते की,

लग्नाचे लाडू खाणाऱ्यालाही पश्चाताप होतो आणि जो खात नाही त्यालाही पश्चाताप होतो. आचार्य चाणक्य यांनीही या विषयावर आपले मत मांडले आहे. मित्रांनो आचार्य चाणक्य हे अनेक विषयांचे सखोल ज्ञान असलेले विद्वान होते. ग्रहांच्या जीवनाविषयीही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये त्यांनी पत्नीच्या ३ विशेष गुणांचीही चर्चा केली आहे.

चाणक्यानुसार, ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये हे ३ गुण असतात ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. असे गुण असलेल्या बायका घराला स्वर्ग बनवतात. यांच्यासोबत लग्न केल्याने वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे गुण. १) जिला ध’र्म आणि वेदांचे ज्ञान आहे :- आचार्य चाणक्य यांच्या मते पत्नीला ध’र्म आणि वेदांचे चांगले ज्ञान असले पाहिजे.

तीची देवावर श्रद्धा असली पाहिजे. जर तिच्यात हे सर्व गुण असतील तर ती योग्य आणि अयोग्य फरक करू शकेल. या प्रकारची पत्नी संपूर्ण घराची चांगली काळजी घेते. घराचा मान व प्रतिष्ठा राखते. समाजात तो अभिमानाने आपले डोके उंचावतो. तिच्या मुलांना योग्य संस्कार देते. कुटुंबातील येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करते.

ती आपल्या पतीला सुख दु:खात नेहमी सात देते. २) गोड बोलणारी :- आचार्य चाणक्य यांच्या मते, आपली पत्नी सभ्य आणि गोड बोलणारी असावी. ज्या व्यक्तीला अशी पत्नी मिळते तो खूप भाग्यवान असतो. त्यांची पत्नी तिच्या चांगल्या वागण्याने आणि गोड बोलण्याने सर्वांची मने जिंकते. अशा महिला संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन जातात.

ते कधीही घरात भांडणे होऊ देत नाहीत. घरामध्ये नेहमी आनंद ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. अशा स्त्रिया सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात. ३) पैसे जपून वापरणारी :- आचार्य चाणक्य मानतात की, स्त्री अशी असावी की जी पैसा साठवून ठेवते आणि त्याचा नाश करत नाही. ज्या महिलेला पैसे वाचवण्याची सवय आहे, ती घरासाठी खूप भाग्यवान आहे.

कुटुंब बिकट परिस्थितीत अडकले असताना स्त्रीने वाचवलेले पैसेच उपयोगी पडतात. त्याचबरोबर महिलेलाही तिच्या वैयक्तिक कामासाठी कुणासमोर हात पसरावे लागत नाहीत. तिला पाहून घरातील मुले आणि इतर सदस्यांनाही पैसे वाचवण्याची प्रेरणा मिळते. आणि यामुळे आपल्या कुटुंबावर पैशाची कमतरता कधीच भासत नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *