नमस्कार मित्रांनो,
इंग्रज वकील टॉम निकोल्स आपल्या दुभाषीसह शिवरायांच्या भेटीसाठी गडावर आला होता. शिवरायांना मुजरा करून लगेच विषयाला हात घातला, तेव्हा टॉम निकोल्स राजांना म्हणाला की, राजे एका बाजूला आम्ही तहाची बोलणी करत असताना, ध्यानीमनी नसताना तुमच्या मावळा सै’निकांनी आमच्या हुबळीच्या वखरीवर ह-ल्ला केला आणि लूट केली.
त्यामुळे आपल्या मुलखात आम्ही वखार सुरू करू की नाही याचा विचार पडला आहे. यावर राजे काहीच बोलले नाहीत, सदैव चेहर्यावर दिसणारी ते स्मितहास्य तसेच होते आणि इतक्यात टॉम निकोल्सने विचारले की, हुबळीची लूट तुमच्या संमतीने झाली होती का? यावर राजे यांनी टॉम निकोल्सला उत्तर दिले की, तुम्हाला माहित आहे, इंग्रजांचा स्नेह रहावा अशी आमची इच्छा आहे. मग आमच्या लोकांनी हा ह-ल्ला केला हे कशावरून?
या प्रश्नाने टॉम निकोल्स थक्क झाला. तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही आमच्या शत्रू मुलखात यु-द्ध करीत असताना, त्यामध्ये कदाचित लूट झालीही असेल, हे सर्व यु-द्धांमध्ये क्षम्य ठरतं. यावर टॉम निकोल्स म्हणाला की, राजे राजापूरची नुकसान भरपाई द्यायला तुम्ही कबुल केले आहे, तर तसाच विचार हुबळीचाही करावा. ही कंपनी सरकारची आणि यापुढे टॉम निकोल्स काही म्हणणार इतक्यातच राजे म्हणाले की, अशक्य !
राजापूरची नुकसानभरपाई आम्ही वचन दिला म्हणून देत आहोत, पण आठवा आम्ही राजापूरची लूट का केली? आमच्याविरुद्ध तोफा घेऊन आमच्या शत्रूला मिळाला. व्यापारासाठी आलेल्या तुम्ही राजकारणात कशाला पडता? हे ऐकताच टॉम निकोल्सचा घसा कोरडा पडला आणि राजे टॉम निकोल्सच्या नजरेला नजर देत विचारते झाले की, सुरत लुटायला आम्ही आलो तुमच्या वखारीत आम्हाला उर्मट उत्तर मिळाली.
5 दिवस आम्ही सुरत चालीत होतो, 30 माणसांची तुमची वखार आम्हाला भारी नव्हती. आम्ही स्नेह जाणतो, पण प्रसंगी तुम्ही तो नेमका विसरतात आणि यावर तो टॉम निकोल्स जे म्हणाला ते ऐकून मात्र राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यापुढे टॉम निकोल्स म्हणाला, आपली गलबत्त घेऊन येणार आहेत, अशी बातमी आहे. त्यावेळी ती आमच्या गलबत्तनी पकडली तर?
हे ऐकताच राजा म्हणाले की, जरूर पकडावी. मी आपल्याला वचन देतो, आम्ही यापुढे याच संधीची वाट पाहू, आपल्या हातून असं घडलंच तर हिंदुस्थानच्या किनारपट्टीवर तुम्हा इग्रजांच एकही गलबत्त तरंगताना दिसनार नाही. सिध्दीला मुंबई बंदरात तुम्ही आश्रय दिलात, हे ही आम्ही जाणतो. त्यामुळे तुमचा व्यापाराकडे आमची बारीक नजर असते,
राजाच्या या निर्णयाचे टॉम निकोल्स पूर्णपणे अस्वस्थ झाला होता आणि आपल्या मुत्सद्दीपणा वापर करून हुबळीची नुकसानभरपाई द्यायला आलेल्या इंग्रज वकील मान खाली करून रिकाम्या हाताने परतला. आपल्या मुत्सद्दीपणाचा वापर करत व्यापारी आमिष दाखवून अनेक छोट्या-मोठ्या राजाना गळाला लावणाऱ्या इंग्रजांना हे कळून चुकले होते की, जोपर्यंत छत्रपती शिवराय आहेत तोपर्यंत आपली डाळ महाराष्ट्रात आणि पर्यायाने हिंदुस्थानात शिजणार नाही. स्वतःला हुशार समजणारेही टॉम निकोल्स रिकाम्या हाताने गडाखाली उतरला.