नमस्कार मित्रांनो,

होळीला होलिकादहन केले जाते, आपल्या आयुष्यातील अरिष्ट, द्वेष, अमंगळ, संकट आपण दहन करतो आणि अग्निदेवतेला प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतो. तसेच हिंदू ध र्म शास्त्रात अशी मान्यता आहे की होळीच्या रात्री अनेक देवी देवता सक्रिय असतात. त्यामुळे या रात्रीला विशेष महत्व आहे.

ही रात्र अत्यंत शुभ मानली जाते. होळीचा सण झाला की दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. होळीला जसे महत्व आहे तसेच या राखेला देखील महत्व आहे. हे ही राख अत्यंत शुभ मानली जाते, या राखेने धुळवड खेळली जाते, भस्माईतकी शुभ मानली जाणारी ही राख अंगाला लावून घेतल्यास आपले आजार व दोष नाहीसे होतात.

या राखेचा उपयोग आपल्या सुखासाठी, समृद्धीसाठी तसेच अनेक दुध, नकारात्मकता नाहीशी करण्यासाठी केला जातो. ही राख घरी आणून ठेवल्यास खूप साऱ्या गोष्टींवर सकारात्मक परिणाम होतो . ही राख घरात कुठे आणि कधी आणून ठेवायची हे आपल्याला माहीत असायला हवे. त्यामुळे तुम्ही हे जाणून घ्या ज्यामुळे तुमची गरिबी नष्ट होऊ शकते.

घरात जर पैसा टिकत नसेल तर तो टिकतो, लक्ष्मीची कृपा होते. आपल्याला आपल्या कामात जर यश मिळत नसेल, अडचणी येत असतील , कुंडलीत दोष असतील तर हा उपाय नक्की करून बघा. होळीच्या दुसऱ्या दिवशी ती राख घरी घेऊन यायचे आहे आणि ती पाण्यात मिसळून घरातील शिवलिंगावरती अर्पण करायची आहे, अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

अशी मान्यता आहे की असे केल्याने आपल्या परिवारातील कलह, वाद नाहीसे होतील तसेच त्यांच्यातील प्रेम, सलोखा वाढतो. तुमच्या डोक्यावर जर कर्जाचा डोंगर असेल आणि ते फेडण्यासाठी तुम्हाला अडचणी येत असतील तर होळीच्या रात्री तुम्ही भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करायची आहे.

विष्णूच्या स्तोत्राचा जप करा त्यामुळे तुम्हाला लवकर मार्ग सापडतील. त्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीतून बाहेर पडाल. नोकरीमध्ये समस्या येत असतील, नोकरीत अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा. एक नारळ घ्यायचा ज्याची साल काढलेली नसेल , तो नारळ स्वतःवरून सात वेळा उतरून तुमच्या इष्ट देवतेचे स्मरण करून पेटत्या होळीत अर्पण करा.

अर्पण करताना भगवान विष्णूंकडे प्रार्थना करा की तुमची अडचण दूर होऊदे. बऱ्याच दीर्घ काळापासून जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर होळीची राख घेऊन त्या आजारी व्यक्तीच्या अंगावर लावा त्यामुळे त्या व्यक्तीची आजारपणातून सुटका होईल. आपल्या घरात जर अनेक सं क टे, अडचणी वारंवार येत असतील, अपघात होत असतील तर तुम्ही या गोष्टी नक्की करा.

होळीची पवित्र राख घरात आणून त्याचा तिलक करून सर्वांना लावा त्यामुळे घरातील, तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल. होळीची राख घरी आणून ती छोट्या काचेच्या पात्रात ठेवायची तसेच त्यामध्ये थोडे खडे म्हणजेच मोठे मीठ, मोहरी मिक्स करा आणि ते पात्र घरातील अशा कोपरयात ठेवा जो स्वच्छ असेल. असे केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते व घरी पैसा, धनसंपत्ती यायला सुरू होते. हा छोटासा उपाय नक्की तुमच्या आयुष्यात भरभराट आणेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील जाणून घ्या