नमस्कार मित्रांनो,

रक्तातील साखर आणि रक्तदाब वाढणे या दोन गंभीर गोष्टी आहेत. आताच्या धकाधकीच्या जीवनात याचा अनेकांना त्रास होत आहे. याच्यावर नियंत्रण न ठेवल्यास तुमच्या आरोग्याचा अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक आयुर्वेदिक वनस्पती मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतात. मधुमेह आणि रक्तदाब यावर कंट्रोल मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतं.

आयुर्वेदिक उपाय किंवा घरगुती उपाय म्हणून काही पाने अनुशी पोटी चावल्यास त्याचा फायदा होतो. दररोजच्या वापरातील पाने तुमच्या श-रीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात. या पानांच सेवन केल्यास दिवसभर रक्तदाब आणि मधुमेह वाढत नाही. या पानांमध्ये कढीपत्ता, कडुलिंबाची पाने आणि तुळशीच्या पानांचा समावेश आहे. हे पाने आपल्याला सहज उपलब्ध होतात.

यांचं सेवन उपाशी पोटी दररोज करावं. याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. मधुमेह हा एक गंभीर आणि असाध्य रोग आहे जो केवळ निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैलीने नियंत्रित केला जाऊ शकतो. या आजारात स्वादुपिंड रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या इन्सुलिन संप्रेरकाचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते.

अशा परिस्थितीत रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका असतो. त्यामुळेच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब ही देखील एक सामान्य समस्या बनली आहे. यावर नियंत्रण न ठेवल्यास तुम्हाला हृदयविकाराचा धोका असू शकतो.

रक्तदाब नियंत्रणाबाहेर गेल्याने अंधुक दृष्टी, थकवा, डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, श्वास घेण्यात अडचण येणे इत्यादी गोष्टी उद्धभवतात. रक्तदाब आणि रक्तातील साखरेसाठी अनेक औ-षधे आणि उपचार आहेत. परंतु काही नैसर्गिक उपायांद्वारे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या गंभीर समस्यांवरही मात करू शकता.

घरामध्ये आढळणाऱ्या काही झाडांच्या पानांमध्ये रक्तातील साखर आणि बीपी नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. कसे ते जाणून घेऊया.
कढीपत्ता फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्य गुणधर्मही आहेत. कढीपत्त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि पोटाशी सं-बंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या पानांचे सेवन अवश्य करावे. असा करा कढीपत्त्याचा वापर कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना उत्तेजित करण्यास मदत होते. या पेशी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तुम्ही उपाशी पोटी ही पाने चघळू शकता. तसेच विविध पदार्थांमध्ये घालू शकता.

कडुलिंबाची पाने कडुलिंबाच्या पानांचेही अनेक आ-रोग्यदायी फा-यदे आहेत. दररोज कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते याचा पुरावा आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर कडुलिंबाची पाने तुमचा सोबती आहेत. कडुनिंबाच्या पानांच्या अँटीहिस्टामाइन प्रभावामुळे रक्तवाहिन्या पसरू शकतात.

यामुळेच ही पाने रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. कडुलिंबाचा अर्क किंवा कॅप्सूल महिनाभर घेतल्यानेही उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. याशिवाय तुम्ही तुळशीला औषधी वनस्पतींची राणी म्हटले जाते. तुळस आपल्या शरीराला अनेक रोगांपासून वाचवते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की,

रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होते. तुळशीची पाने लिपिड्स कमी करून, इस्केमिया, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब कमी करून हृदयरोग रोखण्यासाठी उपयुक्त आहेत. असा वापर करणे बीपी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी तुळशीची पाने चघळणे हा उत्तम उपाय आहे. थोड्या प्रमाणात मिळण्यासाठी तुम्ही ही पाने मिक्सरमध्ये मिसळून देखील पिऊ शकता. लक्षात ठेवा तुळशीच्या पानांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *