नमस्कार मित्रांनो,

अमर असण्याच्या संकल्पना या आपण बऱ्याचदा वाचल्या आहेत. विज्ञान जरी यावर विश्वास ठेवत नसले तरी जवळपास बरेच हिंदू लोकांची यावर श्रद्धा आहे व त्यामुळे यावर विश्वास ठेवून ते भक्ती करतात व त्याचा सकारात्मक अनुभव देखील त्यांना आला आहे.

हिंदू ध र्म पुराणात काही लोकांनी तपस्या करून अमरत्व प्राप्त करून घेतले आहे तर काही लोकांना मिळाले आहे म्हणून देव असूनही ते मानवी लोकांत गुप्तपणे वास करतात, सूक्ष्म रूपाने वास करतात. हिंदू ध’र्मात नेहमीच अशी आठ नावे आहेत ज्यांना अमरत्व मिळाले आहे, ते अजूनही जिवंत आहेत व राहतील देखील.

जरी तुम्हाला या गोष्टी पटत नसतील तरी तुम्ही काल्पनिक कथा म्हणून यांचा आस्वाद घेऊ शकता. अमरत्व म्हणजेच कधीही मृत्यू न होणे. हे अमरत्व अमृत घेतल्याने होते अशी देखील कथा प्रचलित आहे. ही एक अशी शक्ती जिचा नाश कधीच कुणीच करू शकत नाही.

या जगात अनेक दुष्ट आ’त्म्यांनी आणि असुरांनी मृत्यूवर विजय मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना फक्त अपयश आले. त्याचप्रमाणे, काही देव आणि पवित्र आ’त्म्यांनीही प्रयत्न केले आणि काहींना अमर होण्याचे वरदान मिळाले. होय, असे म्हटले जाते की आठ आत्मा आहेत जे आजही अमर आहेत आणि या जगात आमच्यासोबत राहतात. या आठ जीवांना अष्ट चिरंजीवी म्हणतात.

वेद व्यास:- ऋषी वेद व्यास यांनी चार वेद (ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद), सर्व 18 पुराण, महाभारत आणि श्रीमद भागवत गीता यांची रचना केली. ते ऋषी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र होते. त्याचा ज न्म यमुना नदीवरील एका बेटावर झाला होता आणि त्यांचा रंग गडद होता. म्हणूनच त्यांना कृष्ण द्वैपायन म्हणतात. वेद व्यास देखील अनेक युगांपर्यंत जिवंत आहेत.

मार्कंडेय:- काही प्राचीन ग्रंथांत महादेवाचे परम भक्त मार्कंडेय ऋषी यांना दीर्घायुषी असल्याचे म्हटले आहे. शिवाची उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी अल्पायुष्यावर मात करून दीर्घायुष्य प्राप्त केले.

परशुराम:- परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. यांनी अधर्मी क्षत्रियांचा नाश केला, यांच्या दानशीलतेवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना अमरत्व बहाल केले.

हनुमान:- प्रभु रामचंद्राचा सेवक. दास्यभक्तीकरता सदैव तत्पर, रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे रामभक्त हनुमान होय! हनुमान हा चिरंजीव असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे. जेथे जेथे प्रभु रामचंद्राचे नाव घेतल्या जाते त्या ठिकाणी सर्वात आधी येणारा हनुमंत असतो असे मानले जाते.

राजा ब’ळी:- भक्त प्रल्हादचा वंशज म्हणजेच राजा बळी. अतिशय न्यायप्रिय. बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, असे मानतात. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. वामन अवतारातील भगवान विष्णूंना सर्व संपत्ती देऊन यांनी अमरत्व प्राप्त केले आहे.

अश्वत्थामा:- अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. शास्त्रामध्ये तो अमर असल्याची मान्यता आहे.

कृपाचार्य:- कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे आद्य गुरू होते. नंतरचे गुरू द्रोणाचार्य. कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात न आल्याने त्यांना अमर समजले जाते.

विभीषण:- विभीषण हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याने अध’र्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम-रावण यु-द्धामध्ये रामाला मदत केली. बिभीषणाच्या मृत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने बिभीषण अमर समजला जातो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *