अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी खर्चात, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पायाचे काळे डाग किंवा पायाचा काळा थर काळेपणा तसेच पायांना कितीही घाण चिकटलेली असली तरी हात-पायांवर असलेल्या बॅक्टेरिया काढण्यापर्यंतची पद्धत आज तुम्हाला सांगणार आहे. या उपायाने तुम्ही तुमचे पाय दुधासारखे स्वच्छ, सुंदर आणि मऊ करू शकता. तसेच या उपायाने तुमचे हात-पाय आरशासारखे चमकतील.

यासाठी तुम्हाला रिकाम्या पात्रात पाणी घ्यायचे आहे, मात्र हे पाणी गरम असले पाहिजे. यासाठी तुम्हाला एक काचेचा बाउल घायचा आहे आणि ते बाऊल अर्धे गरम पाण्याने भरून घ्या. कारण गरम पाण्यामूळे साफसफाई चांगली केली जाते, त्यामुळे आपण येथे गरम पाणी वापरत आहोत. तसेच तुम्हाला यासाठी पुढील वस्तू म्हणजे 10 रुपयाची तुरटी घ्यायची आहे. ही तुरटी तुम्हाला बाजरात सहज उपलब्ध होईल.

मग ती आणून बारीक करून घ्या. मग त्यानंतर ती एक चमचा बारीक केलेली तुरटी या गरम पाण्यात मिसळा. गरम पाण्यात तुरटी मिसळल्याने अनेक फायदे आहेत. यामुळे हातावरील असे बॅक्टेरिया निघून जातात. काळे डाग आणि त्वचा साफ होण्यास सुरुवात होते. यासोबतच ज्या लोकांच्या पायाला दुर्गंधी येत असल्यास , तुरटी लावल्याने पायाचा वासही निघून जातो.

तुरटी नंतर इथे लिंबू घ्यायचे आहेत. कारण हाता-पायावरील घाण लवकर काढण्यासाठी लिंबू सर्वोत्तम मानला जातो. तसेच यामुळे ही घाण काढण्यासाठी लिंबाचा रस खूप महत्त्वाचा आहेच, कारण लिंबूच्या रसामुळे हात-पायांच्या गाठी साफ होतात. त्यामुळे अशा प्रकारे तो अर्धा घेतलेला लिंबू त्या पाण्यात पिळून घ्यावे.

तसेच पुढील वस्तू आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे मीठ. यासाठी पांढरे मीठ वापरले पाहिजे. हे मीठ या पाण्यात मिसळावयचे आहे आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्हाला या मिश्रणात शॅम्पू वापरायचा आहे. मग तुम्ही तो 1 रुपयाचा चा क्लिनिक प्लस घेऊ शकता आणि तो संपूर्ण शैम्पू या पाण्यात मिसळून घ्या. मग आता या सर्व वस्तू पूर्णपणे एकजीव करून घ्या. तसेच तुम्ही ते चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता.

याचा जोपर्यंत फेस तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण एकजीव आणि ढवळत राहावे. मग त्यानंतर हा उपाय तयार होईल आणि हा उपाय खूप स्वस्त आहे. मग हे मिश्रण म्हणजे तयार केलेला फेस आपण 2 प्रकारे लावू शकतो. पहिला म्हणजे, जेव्हा आपण आंघोळीच्या आधी 15 ते 20 मिनिटे अगोदर एक कापड घ्या आणि या मिश्रणात ते कापड योग्य प्रकारे भिजवून घ्या. मग ते कापड जिथे-जिथे तुमच्या हातपायांवर घाण साचली असेल तिथे-तिथे चांगले लावून घ्या.

जसं जसे लावून घासाल तसतसे तुमच्या त्वचेतून घाण बाहेर येईल. तसेच नखांवर साचलेली घाण सुद्धा निघून जाईल. मग 5 मिनिटे नीट घासल्यानंतर, 10 मिनिटे असेच राहू द्या आणि त्यानंतर अंघोळ करा. ज्यामुळे तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल. दुसरा उपाय म्हणजे, जेव्हा तुम्ही थकून घरी येत तेव्हा हे मिश्रण अधिक प्रमाणात बनवून घ्या, त्यामध्ये हात किंवा पाय बुडवून ठेवू शकता.

यामुळे तुमचा दिवसभराचा थकवाही निघून जाईल. यासोबतच तुमच्या हाता-पायात जी घाण असेल तीही स्वच्छ होईल. तसेच हात यामध्ये 10 मिनिटे ठेवल्यानंतर, तुम्ही तुमचे नखे एका ब्रशच्या साहाय्याने घासुन स्वच्छ देखील करू शकता.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *