नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. देवाने खूप अशा सुंदर सृष्टी निर्मिती केली आहे. या सृष्टीचे कार्य उत्तम चालण्यासाठी काही नियम देखील असून त्याचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे. प्रत्येकाची आपल्या प्रिय देवावर खूप श्रद्धा आणि भक्ती असते. प्रत्येक देवाची वेगळीच महती असते. प्रत्येक व्यक्तीला तो देव नेहमी मदत करत असतो.
त्यामध्ये दत्त महाराज आणि स्वामी समर्थांची भक्ती सगळेच लोक करतात. स्वामी आणि दत्त गुरु त्यांना खुप आशीर्वाद देखील देतात. स्वामी समर्थ म्हणजे साक्षात दत्त गुरूंचे अवतार आहेत. गुरु दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश हे साक्षादेव आहेत.या तिन्ही देवतांच्या हातातून या विश्वाचा कारभार सुरु आहे.
दत्त गुरु हे साक्षात आपले पालनकर्ता आहेत. प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक वाचनाची आवड असते. आपण नेहमी धर्म ग्रंथाचे पारायण करत असतो. यामुळे आपल्या मनात सकारात्मक उर्जा मिळते. गुरुचरित्राचे पारायण करण्याची प्रामाणिक इच्छा खूप जणांची असते. काही लोकांच्या हातून गुरुचरित्राचे पारायण होते, तर काही लोकांना इच्छा असून देखील पारायण करणे जमत नाही.
प्रत्येक भक्ताची मनात एक श्रद्धा असते की, गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे मनातील इच्छा नक्की पूर्ण होतात. प्रत्येक कामात अगदी सहज यश लाभते. गुरुचरित्राचे पारायण करताना काही नियम दिले आहेत. गुरुचरित्र पारायण हे ५२ अध्यायाचे असते ,सात दिवस कठीण नियम पाळून हे करायचे असून याचे नियम खूप कडक आहेत.
काही लोकांना हे पारायण करता येत नाही. काही व्यक्तींना नियम पाळता येत नाहीत. परंतु गुरुचरित्राच्या पोतीचे पारायण करणे हि त्यांची खूप प्रामाणिक इच्छा असते. त्यांची इच्छा या लेखातून नक्की पूर्ण होणार आहे. गुरुचरित्राचे ग्रंथ हे खूप पवित्र आहे. याचे पारायण करण्यासाठी काही नियम आहेत. तुमची जर स्वामी आणि दत्त गुरुवर खूप श्रद्धा असेल आणि गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल तर, तुम्ही एक काम अवश्य करा की त्या कामासाठी कोणतेही नियम नाहीत.
गुरुचरित्र पारायणचा एक श्लोक असून त्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठून अंघोळ करून देवघरासमोर बसून भक्तीने आणि विश्वासाने श्लोकाचे पठन करा. हा श्लोक भक्तीने पठण केल्यामुळे गुरुचरित्र पारायण केल्याचे लाभ तुम्हाला मिळतील. हा श्लोक खूप सुंदर आहे. या श्लोकाचे पठन तुम्ही दररोज सकाळी उठून अंघोळ करून देवासमोर दिवा लावून म्हणू शकता.
दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठपिठापूरी यामागे दुसरा नरसिंहसरस्वती करंजग्रमांतरी तीर्थे हिडत पातला भीलूवाडीचीये संगमा तेथुनी मठ गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा.
वरील हा श्लोक व्यवस्थित बघून दररोज सकाळी उठून अंघोळ करून देवासमोर बसून याचे पठण करा. या श्लोकाचे कोणतेही नियम नाहीत. हा श्लोक भक्तीने बोलल्यास देखील याचा खूप लाभ होतो. तुमच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते. स्वामी समर्थ आणि दत्त गुरु खूप आनंदाने भक्ताची इच्छा पूर्ण करतात.
स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांना सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. यामुळे त्याच्या बद्दल विश्वास निर्माण होतो. स्वामी महाराज सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो हीच मनोकामना आहे.वरील महिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.