नमस्कार मित्रांनो,
वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य द्वार हे फक्त प्रवेश करण्याचे ठिकाण नाही तर उर्जेचा मार्ग देखील आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी उत्तर, ईशान्य, पूर्व किंवा पश्चिम ही सर्वोत्तम दिशा आहे जी शुभ मानली जाते आणि घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह सुनिश्चित करते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते.
त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते. घर एक असे ठिकाण असते जिथे व्यक्तीला शांती तसेच प्रसन्नता मिळते. कामावरून घरी आले की घरात प्रसन्न वाटले पाहिजे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातही काही बदल कऱण्याची गरज असते. घराचा मुख्य भाग असतो ते म्हणजे प्रवेशद्वार. घराच्या दरवाजावर अशा काही वस्तू ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे सकारात्मक बदल होईल.
मुख्य दरवाजाची दिशा वास्तुशास्त्राचा एक महत्त्वाचा भग असतो. घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास सगळ्यात उत्तम मानले जाते. यामुळे आयुष्यात नेहमी विजय, सुख तसेच शुभ घटना घडतात. उत्तर दिशेला दरवाजा असल्यास ते कुबेराचे दार मानले जाते. या दिशेला दरवाजा असल्यास धन तसेच सुखप्राप्ती होते.
घराच्या प्रवेशद्वारावर काचेचे भांडे जरूर ठेवा.
यात सुगंधित फुले टाका. यामुळे घरात सकारात्मकता येईल. तसेच आनंदही घरात येईल. याचबरोबर, अनेकांच्या घराच्या प्रवेशाद्वारावर माळा तुम्ही पाहिली असेल. घराच्या दरवाजावर पिंपळ, आंबा अथवा अशोकाच्या पानांची माळ लावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. तसेच घरात समृद्धी येईल. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीची पावले नक्की लावा.
तसेच ही पावले लावताना त्यांची दिशा घराच्या आतील दिशेस हवीत. लक्ष्मी घरात प्रवेश करत आहेत अशी लावावीत. यामुळे घरात समृद्धी येते. याशिवाय, घराच्या मुख्य दरवाजावर शुभ-लाभचे निशाण असणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी निवास करते. लक्ष्मीची पावले, शुभ-लाभ या व्यतिरिक्त स्वस्तिकचे निशाणही घराच्या दरवाजावर लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने सौभाग्य आणि समृद्धी वेगाने वाढते.
घराचा मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांच्या तुलनेत मोठा असला पाहिजे याची काळजी घ्या. तसेच हा दरवाजा घड्याळाच्या दिशेने उघडला पाहिजे. घराच्या समृद्धीसाठी हे शुभ मानले जाते. तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचे विशेष महत्त्व आहे. आत राहणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी हे प्रवेशद्वार म्हणून काम करते.
त्याच वेळी ते नकारात्मक ऊर्जांविरूद्ध एक अडथळा देखील आहे. तुमच्या घरातील उर्जेच्या प्रवाहावर हा मुख्य घटक असल्यामुळे, तुम्ही ते वास्तुशास्त्राच्या विज्ञानाशी सुसंगत असल्याची खात्री केली पाहिजे. जर तुमच्या घराचे प्रवेशद्वार दक्षिण-पूर्व दिशेला असेल तर तुम्हाला काही उपाय करावे लागतील ज्यामुळे हा दोष दूर होईल.
आग्नेय प्रवेशद्वार घरांमध्ये वास्तू दोषांवर काम करणारे काही उत्तम वास्तुशास्त्र उपाय खाली नमूद केले आहेत. दक्षिण पूर्व मुखी घराचे प्रवेशद्वार वास्तुशास्त्र हे पृथ्वी, जल, वायू, अग्नि आणि अवकाश या पाच तत्वांवर आधारित आहे. आग्नेय ही अग्नी तत्वाची दिशा मानली जाते. दिशेत अग्नी तत्व असल्याने, आरोग्य, संपत्ती आणि चांगले जीवन यासह माणसाच्या उत्कटतेसह विविध घटकांवर त्याचा परिणाम होतो. अग्नि घटक शक्ती आणि नातेसंबंधांवर देखील परिणाम करतात.