नमस्कार मित्रांनो,

आज आपण आपल्या घराला जो उंबरठा असतो त्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या घराच्या मुख्य दाराला खालच्या बाजूला जी लाकडी पट्टी असते तिला उंबरठा म्हणतात. चार लाकडी पट्टया जोडून जी तयार केली जाते ती चौकट, परंतु आजकाल बहुतांश घरामध्ये आजूबाजूला व वरच्या साईड ला पट्टी असते पण खाली पट्टी लावलेली नसते.

मग ती चौकट कशी होईल ती तर त्रिकट होते. पण पाहायला गेलं तर बिना उंबरठ्याचे घर असूच नये. कारण हिंदू धर्म शास्त्रात उंबरठ्याला खूप महत्व दिले गेले आहे. असे म्हंटले जाते की देवी लक्ष्मीने आपल्या घरात निरंतर व स्थिर वास करावा यासाठी घराला उंबरठा आवश्य असावा. पूर्वीच्या काळी दररोज उंबरठ्याची पूजन होत असे व घर बांधताना शुभ मुहूर्त पाहूनच चौकट लावली जात असे.

कोणत्याही प्राचीन मंदिरामध्ये आपण पाहतो की उंबरठ्याला नमस्कार करून मगच आत प्रवेश केला जातो. उंबरठा ओलांडल्या शिवाय आपण मंदिरात प्रवेश करू शकत नाही. त्याप्रमाणेच कोणतीही बाहेरची व्यक्ती घरात प्रवेश करताना उंबरठा ओलांडुनच आत यावी अशी आपल्या घराची रचना असावी. उंबरठ्यामुळे कितीतरी सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात आणि कितीतरी दुष्प्रभावापासून आपल्या घराचे संरक्षण होते.

त्याबरोबरच माता लक्ष्मी स्थिर राहावी व प्रसन्न राहावी यासाठी ही उंबरठ्याचा प्रभाव असतो. असे म्हंटले जाते की ज्या घराच्या चौकटीला उंबरठा नसतो तिथे माता लक्ष्मी टिकत नाही. आणि हा अनेकांचा अनुभव आहे की उंबरठ्यामुळे खूप फा-यदे होतात. उंबरठा आपल्या कुटुंबाला संस्कार व शिक्षण प्रदान करतो. तसेच आपल्या शत्रूच्या कु दृष्टीला व त्यांच्या वाईट कारवायांना घराच्या आत येऊ देत नाही असे प्राचीन शास्त्रात सांगितले आहे.

जर घराचे बांधकाम करताना उंबरठ्याच्या खाली चपटी तांब्याची तार सरळ रेषेत टाकली तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात. व त्यातून आपल्याला दिव्यत्वाची अनुभूती येते. शक्य असल्यास लाकडी उंबरठा घराला शुभ असतो म्हणून घराला लाकडी उंबरठा बसवावा. असे म्हणतात की आपण घराबाहेर पडताना उंबरठा आपल्याला प्रश्न विचारतो की तू कोणत्या कामासाठी बाहेर जात आहेस,

तू वाईट काम तर करणार नाहीस ना व घरी येताना ही कोणते काम तू करून आला आहेस आशा प्रकारे आपल्या वाईट कर्मांवर उंबरठ्यामुळे लगाम बसतो. दररोज सकाळी घराच्या सुवासिन स्त्रीने उंबरठा धुवून त्याचे पूजन करावे. तसेच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे हे खूप शुभ असते व त्याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला पहायला मिळतात. तर घर बनवताना आधी मुख्य दाराला उंबरठा बनवा मगच बाकीचे कामे करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *