नमस्कार मित्रांनो,

घोरण्याचा त्रास अनेकजनांना आहे आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय सुद्धा आहेत. आज आपण एक साधा आयुर्वेदिक उपाय पहाणार आहोत. त्या आधी घोरण्याची समस्या का उद्भवते हे जाणून घेणार आहोत. घोरण्याचे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण जर आपलं वजन वाढलेलं असेल आणि जर आपल्याला दा-रूच व्य-सन असेल, सि-गारेट ओढण्याचं व्य-सन असेल.

जर आपल्याला नाकपुड्या मध्ये पडदा आहे त्यात जन्मतःच काही दोष असेल किंवा आपल्या घशातील त्वचा ती जर जास्त मऊ असेल, जर आपण पुरेशी झोप घेत नसाल किंवा जर आपण पाठीवर झोपत असाल. तर ही कारणं आहेत की ज्यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते. तर या सर्व समस्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा.

आता आपल्या घशातील त्वचा मऊ पडलेली आहे त्यामुळे होत काय ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी आपलं शरीर आपल्या घशातील स्नायूंना सैल करत ते स्नायू सैल झाल्यामुळे त्याची साईज वाढते आणि परिणामी ज्यावेळी स्वासोच्छवास करताना ही त्वचा कंप पावते आणि परिणामी घोरण्याचा आवाज येतो.

तर आपल्याला हा त्रास ठीक करण्यासाठी दोन पदार्थ लागणार आहेत पहिला पदार्थ देशी गाईचं तूप आणि दुसरा पदार्थ हळद लागणार आहे. आपण रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर हळद बोटावर घेणार आहोत आणि हे बोट आपली पडजीभेला आणि त्याजवळपास जे काही त्वचा आहे त्याठिकाणी आपण ही हळद लावणार आहोत.

ज्यावेळी आपण हळद लावाल त्यावेळेस थोडस पाणी येईल हे पाणी थुंकू शकता. हा उपाय पहिल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. दुसऱ्या दिवशी झोपण्यापूर्वी 1 थेंब तूप उजव्या नाकपुडीत आणि 1 थेंब डाव्या नाकपुडीत टाकणार आहोत आणि मान पाठीमागे टाकून तशीच 10 मिनिटे बसणार आहोत यामुळे तूप आत जावू लागेल.

आशाच प्रकारे 8 दिवस म्हणजेच 4 दिवस हळदीचा प्रयोग आणि 4 दिवस तुपाचा प्रयोग आपल्याला करायचा आहे. यामुळे आपली जी सेल झालेली त्वचा आहे तिचा सेल्सरपणा कमी होईल आणि परिणामी जे कंपन निर्माण होतात हे कमी होत जातील आणि शेवटी तुमचे घोरणे बंद होईल. तर हा प्रयोग नक्की करून पहा. याचा प्रभाव 3 ते 4 महिने राहतो. जेंव्हा तुम्हाला पुन्हा घोरण्याचा त्रास होईल तर हिच क्रिया पुन्हा करा तुम्हाला तात्काळ अराम मिळेल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *