नमस्कार मित्रांनो,
आज आपण देवा समोर दिवा लावत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या संदर्भात माहिती घेणार आहोत. सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवासमोर दिवा लावावाच लागतो. पण देवासमोर दिवा लावत असताना काही गोष्टींकडे लक्ष देने अतिशय आवश्यक आहे. आणि जोपर्यंत देवघरासमोर दीप लावला जात नाही तोपर्यंत पूजा करू नये असं शास्त्र सांगत.
एकदा का दिवा लावला की त्यानंतर आपल्याला देवपूजा करण्यासाठी अधिकारी प्राप्त होत असतो. चला तर जाणून घेऊ या देवा समोर दिवा लावताना कोणत्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले जे काही चांगले कर्म आहेत ते ईश्वरांपर्यंत पोहचवण्याचे कार्य दिवा करत असतो. म्हणून देवपूजा करण्याआधी सर्वात आधी दीप लावून दीप पूजन करून त्यानंतर पूजा करावी.
घरामध्ये दिवा लावल्यानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश होते. घरात सकारात्मक ऊर्जा जर प्राप्त करायची असेल तर सकाळ-संध्याकाळ देवघरात दिवा नक्की लावला पाहिजे. ज्या घरी देवघरात लावला जाणार दिवा मळकट व तेलकट असेल काळसर पडलेला असेल तर अशा घरी संकटे येण्याची शक्यता असते.
त्यामुळे देवघरात लावला जाणार दिवा नेहमी स्वच्छ ठेवावा. तसेच दिवा फुटलेला असेल आणि त्यातून जर नेहमी तेल गळत असेल तर हे सुद्धा घरात संकट येण्याचे संकेत आहेत. यामुळे दिवा फुटलेला असू नये. देवघरात तेलाचा दिवा लावल्याने आपले कष्ट दूर होतात. संकटे येत नाहीत आणि कोणत्याही प्रकरची बाधा होत नाही.
त्याचबरोबर जर घरात लक्ष्मी स्थिर राहावी असे वाटत असेल तर देवघरासमोर तुपाचा दिवा आवश्य लावा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तेलाचा आणि तुपाचा दिवा वेगवेगळा लावावा. तेल आणि तुप एकत्र करून देवासमोर दिवा लावलात तर त्या घरामध्ये नेहमी संकटे व आजारपण येत असतात.
अनेक जणांना प्रश्न पडतो की देवघरात समई कोणत्या दिशेला लावावी? तर तेलाचा दिवा लावत असताना देवाच्या डाव्या बाजूला समई लावावी. आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला असावा. त्याचबरोबर दिव्याची वात नेहमी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावी. ज्या देवघरात पूर्व व उत्तर दिशेला दिवा लावला जातो त्या घरात धन संपदा याचा योग येत असतो.
तसेच पश्चिम किंवा दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून लावू नये. यामुळे तुमच्यावर अनेक अज्ञात संकटे येतात. तर देवा समोर दिवा लावत असताना इत्यादी गोष्टींची काळजी आवश्य घ्या. घरात लक्ष्मी, संपत्ती, आरोग्य नक्कीच आपल्या घरी वास करेल.