नमस्कार मित्रांनो,
अक्षय पुण्याची प्राप्ती करून देणारा दिवस म्हणजे अक्षय तृतीया आहे. वर्षात जे साडेतीन शुभ मुहूर्त येतात त्यापैकी हा एक मुहूर्त या वर्षी 3 मे मंगळवारी अक्षय तृतीया आलेली आहे. या वर्षी जर आपल्या घरात गरिबी असेल दरिद्रता असेल किंवा तुम्ही जितकी मेहनत करता तितका पैसा येत नसेल. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मूठभर तांदळाचा उपाय अगदी आवर्जून करा.
या दिवशी केलेलं स्नान, दान हे पुण्य अक्षय टिकत अशी मान्यता आहे. तर आज आपण जाणून घेऊ या मूठभर तांदळाचा उपाय कसा करायचा. यासाठी आपण अक्षय तृतीया दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं व स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. जर तुमच्या कडे लाल रंगाचे वस्त्र असतील तर ते नक्की परिधान करा. कारण हा उपाय करताना लाल रंगाची वस्त्र परिधान केल्याने खूप लवकर फलदायक ठरतो.
लाल रंगाची वस्त्र नसतील तर पांढरा किंवा पिवळा रंगाची वस्त्र सुद्धा परिधान करून हा उपाय करू शकता.. आशा प्रकारचे शुचिर्भूत झाल्यानंतर आपण देव पूजा करायची आहे. आणि देवघरात किंवा देवघराच्या शेजारी आपण एखाद्या पाटावर लाल रंगाचा वस्त्र अंथरूण त्यावर माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती ठेऊन पूजा करायची आहे.
तसेच शुद्ध तुपाच्या दिव्यात 1 चुटकी हळद टाकून दिवा प्रज्वलित करा. आणि धूप अगरबत्ती लावा लाल फुले अर्पित करा व तांदळाच्या खीरीचा नैवैद्य आपण आवश्य दाखवा. अक्षय तृतीया दिवशी केलेली लक्ष्मीची पूजा आपल्या घरात कधीच धन धान्य कमी पडू देत नाही. माता लक्ष्मी चे पूजन प्रारंभ करण्यापूर्वी माता लक्ष्मी च्या फोटो किंवा मूर्ती जवळ अगदी छोटस 1 लाल रंगाचा रेशमी वस्त्र अंथरायचं आहे. लाल रंगाचा वस्त्र नसेल तर पिवळा किंवा गुलाबी रंगाचं वस्त्र तुम्ही वापरू शकता मात्र ते वस्त्र रेशमी असेल याची काळजी घ्या.
त्यावर मूठभर अक्षद म्हणजे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. आणि त्या वस्त्राची पोटली बांधून माता लक्ष्मी च्या चरणा समोर ठेऊन पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची पूजा संपन्न होताना एक छोट्याशा मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. तुमच्या घरात जपमाळ असेल तर जपमाळेवर आपण जप करू शकता. मंत्र आहे ॐ श्री श्रीये नमः हा मंत्र जप केल्यानंतर माता लक्ष्मी समोर नतमस्तक होऊन तुमच्या जिवनातील पैशाची कमतरता असेल ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या समस्या दूर करण्याची प्रार्थना माते चरणी करा.
आणि त्यानंतर ती तांदळाची पोटली घेऊन आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ही पोटली नेऊन ठेवायची आहे. इथून पुढे ज्या वेळी पौर्णिमा येईल किंवा माता लक्ष्मी ची विशिष्ट तिथी येईल त्या तिथीला ती तांदळाची पोटली माता लक्ष्मी समोर ठेऊन माता लक्ष्मीचे पूजन करा व नैवैद्य अर्पण करा आणि ही पोटली पुन्हा एकदा तिजोरीत ठेऊन द्या.
जोपर्यंत ही तांदळाची पोटली तुमच्या तिजोरीत राहील तोपर्यंत तुमच्या पैशात सतत वाढ होत राहील. जे रेशमी वस्त्र आपण वापरलेलं आहे हे माता लक्ष्मीला आकर्षित करतं तसेच जे तांदुळ आहेत ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत ज्या मंत्राचा जप सांगितला आहे हे सर्व गोष्टी माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय असल्याने या सर्व गोष्टी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसवतात.
अनेक लोकांना या अंधश्रद्धा वाटतात. मात्र ज्यांनी हा उपाय केला त्यांना याचे अत्यंत चांगले परिणाम प्राप्त झाले आहेत. अत्यंत साधा पण प्रभावशाली उपाय आपण अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर नक्की करा.