भारतीय मसाल्यांमध्ये मुख्य मसाला म्हणून काळी मिरीचा वापर करण्यात येतो. चव आणि त्याचा सुवास हे दोन्ही भारतीय पदार्थांमध्ये महत्त्वाचं असतं. काळी मिरीचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं नाव आहे. वै’ज्ञानिक नाव पायपर निग्रा’म असं असून याचा वापर औषध आणि मसाला असा दोन्ही करता येतो. यामध्ये असणाऱ्या पिपेरिनमुळे याची चव ही खूपच तिखट असते.
काळ्या मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची ख’निजं आणि विटामिन्सदेखील असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी ६ चं भरपूर प्रमाण आहे. या विटामिन्सशिवाय यामध्ये रायबो’फ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हेदेखील सापडतं. या कारणांमुळे स्वादासह काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही ला’भदायक आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या गुणकारी काळ्या मिरीचे सर्व फा’यदे आणि नुकसान सांगणार आहोत.
काळ्या मिरीचे औषधीय गुण:- कडव्या चवीची काळी मिरी ही आपल्याला बऱ्याच तऱ्हेने उपयोगी असते. काही आजारांवर काळी मिरी हा अप्र’तिम उपायही आहे. तुम्हाला कदाचित याबाबत काही माहीत नसल्यास, आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. पाहूया काय आहेत काळी मिरीचे फा’यदे.
भूक वाढवते – तुमच्या जेवणाची चव अधिक चांगली करण्याबरोबरच काळी मिरी तुमची भूक वाढवण्याचं काम चांगल्या प्रकारे करते. आपल्या सुवासाच्या माध्यमातून काळी मिरी तुमची भूक वाढवण्यास मदत करते. तुम्हाला जर कमी भूक लागत असेल तर, काळी मिरी आणि गुळाचं मिश्रण तयार करून तुम्ही खा. त्यामुळे तुम्हाला योग्य भूक लागेल. आणि सोबतच ते पचनास मदत होईल.
कॅन्सरपासून संर’क्षण – काळ्या मिरीमध्ये अँटीऑ’क्सीडंट असतात, जे ब्रे स्ट कॅन्सरसारख्या आजाराशी ल’ढा देण्यास मदत करतात. काळ्या मिरीमध्ये असणारे पिपेरिन हे कॅन्सरशी ल’ढा देण्यामध्ये अग्रेसर असतं. प्रोटेस्ट कॅन्सरमध्ये वापरण्यात येणाऱ्या किमोथेरपीमध्ये देखील पिपेरिन वापरण्यात येतं. त्यामुळे काळी मिरी कॅन्सरपासून तुमचं संर’क्षण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलते.
पचनश’क्ती वाढवते – काळी मिरी टेस्ट बड्स उ’त्तेजित करते आणि पोटामध्ये हाय’ड्रोक्लो’रिक ऍ’सिडचा स्रा’वदेखील वाढवते. त्यामुळे उत्कृष्ट आणि पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत मिळते. पचनाच्या सुधाराव्यतिरिक्त काळ्या मिरीमुळे पोटात सूज, पोट फुगणं, अपचन, पोटातील गॅस आणि ब’द्धकोष्ठ या सगळ्या स’मस्यांपासूनही काळी मिरी सुटका मिळवून देते.
ताण दूर ठेवते – काळ्या मिरीमध्ये असणाऱ्या पिपेरिनमध्ये अँटी ऑ’क्सिडंट गुण सापडतात. त्यासाठी काळ्या मिरीच्या सेवनाने तणाव आणि डिप्रे’शनपासून सुटका मिळते.
गॅस आणि ऍ’सिडिटी पासून सुटका – काही लोकांना बऱ्याचदा पोटामध्ये गॅस निर्माण होणं अथवा ऍ’सिडिटीचा सतत त्रास होत असतो. तुम्हाला देखील असा त्रास असेल तर लिंबाच्या रसामध्ये काळं मीठ आणि काळी मिरी पावडर घालून तुम्ही चिमूटभर खा. तुम्हाला या त्रा’सापासून लवकरात लवकर सुटका मिळेल.
ज’खम भरली जाते – तुम्हाला कोणत्याही प्रकारची ज’खम झाली असेल किंवा र’क्त थांबत नसेल तर काळी मिरी कुटून त्यावर लावावी. काळी मिरी अँटीबॅ’क्टेरियल, अँटीसे’प्टिक आणि दुःखनि’वारक असते, यामुळे तुमची ज’खम लवकर भरते. पोटातील जं’तूंचा नाश होतो – खाण्यामध्ये काळी मिरी पावडरचा वापर केल्याने पोटातील जं’तूंंचाही नाश होतो. काळ्या मिरीबरोबर बेदाणे खाल्ल्यास या स’मस्येपासून लवकर सुटका होते.
सर्दीपासून सुटका- काळ्या मिरीचा वापर केल्याने तुमचा कफ कमी होतो. तसंच तुमचं नाक भरलं असेल आणि तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यासाठीदेखील तुम्हाला काळ्या मिरीचा वापर हा फा’यदेशी’र ठरतो. यामध्ये रोगा’णुरोधी गुण असतात. त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर, अशावेळी काळ्या मिरीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
गाठीवर उपचार – काळ्या मिरीमध्ये असणाऱ्या पिपेरिनमध्ये अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटी गाठीचे गुण सापडतात. त्यामुळे तुम्हाला श’रीरावर गाठ झाली असल्यास, तुम्हाला त्याचा फा’यदा मिळतो. काळ्या मिरीचं तेल हे तुमच्या त्वचेला उष्णता मिळवून देतं. त्यामुळे गाठीने पीडित असलेले लोक याचा वापर करू शकतात. त्याचा गाठ बरी होण्यासाठी उपयोग होतो.
कोंड्याची स’मस्या दूर होते – तुमच्या केसांमध्ये कोंड्याची स’मस्या झाली असेल तर तुम्ही दह्यामध्ये १ चमचा वाटलेली काळी मिरी त्यामध्ये मिसळा आणि ती तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर केस थंड पाण्याने धुवा. दुसऱ्या दिवशी केस शँपूने धुवा.
पिंपल्सपासून मिळवा सुटका – काळी मिरीचे २० दाणे गुलाबपाण्यात वाटून रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. रात्रभर तसंच ठेऊन तुम्ही सकाळी उठल्यावर चेहरा गरम पाण्याने साफ करा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सुरकुत्यांची स’मस्या कमी येईल आणि चेहरा साफ होईल.
ताप – एखाद्याला ताप येत असेल तर काळ्या मिरीचा काढा करून त्या आजारी माणसाला पाजा. तसंच जर एखाद्याला मलेरिया झाला असेल तर काळ्या मिरीचं चूर्ण आणि तुळशीच्या रसामध्ये मध मिसळून पाणी प्यावं. त्यामुळे मलेरियाचा ताप लवकर बरा होतो.
कफवाला खोकला – काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घ्या. त्यामध्ये देशी तूप घालून त्याच्या लहान गोळ्या बनवा. दिवसातून ३-४ वेळा १-१ गोळी चोखल्यास, तुमचा कफ असलेला खोकला निघून जातो. घसा एकदम साफ होतो.
पाहिलेत मिरी किती उपयोगी आहे तुमच्यासाठी. मग यापुढे काळी मिरी चा वापर तुमच्या दै’नंदिन आहारात करायला विसरु नका. काळी मिरी ही अतिशय उष्ण असते आणि त्यामुळेच याचे कितीही फा’यदे असले तरीही याचा वापर हा प्रमाणातच करायला हवा.